आज शुक्रवार दि.11/2/2022 रोजी नवलभाऊ प्रतिष्ठान, संजय एज्युकेशन,ग्रामविकास मंडळ आणि रुख्मिणिताई प्रतिष्ठान या संस्थांच्या मालकीच्या इमारती इ. 10 वी व इ 12 वी. बोर्ड परिक्षेसाठी उपलब्ध करून देणार नाही. आज वरील संबंधित संस्थेच्या मुख्याध्यापकांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री नितिन बच्छाव साहेब यांना मा. संस्था अध्यक्ष यांच्या निर्णय नुसार संस्थेच्या मालकीच्या असणाऱ्या शाळा मार्च/एप्रिल मध्ये होणाऱ्या 12 वी/10 वी बोर्ड परीक्षेसाठी इमारती वापरायला देणार नाही असा आदेश असल्यामुळे त्या संदर्भातील निवेदन जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री नितिन बच्छाव साहेब यांना निवेदन दिले. संबंधित संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. आबासाहेब श्री डी. बी. पाटील सर,संस्थेचे मानद शिक्षण सचिव प्रा. श्री सुनिल गरुड सर यांच्या स्वाक्षरीचे निवेदन देतांना श्री आर. एस. सानप,मुख्याध्यापक, गौरीशंकर मा. वि. रवंजे, श्री व्ही. ए.सैनदाने, मुख्याध्यापक, मा. वि. मालशेवगे, श्री एन. एस. पाटील, मुख्याध्यापक, सिद्धेश्वर मा. वि. पिंपळकोठा बु।। आणि वरिष्ठ शिक्षक भैय्यासाहेब श्री मंगेश पाटील उपस्थित होते.
Home पाचोरा तालुका नवलभाऊ प्रतिष्ठान, संजय एज्युकेशन,ग्रामविकास मंडळ आणि रुख्मिणिताई प्रतिष्ठान या संस्थांच्या मालकीच्या इमारती...