आसनखेडा येथे पी आय पदी नियुक्त झालेले मंगेश बोरसे यांचा सत्कार उत्साहात संपन्न
नांद्रा ता. पाचोरा येथे आज दिनांक 5 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता महादेव मंदिराच्या प्रांगणात नुकतेच मुंबई ला पोलीस कॉन्स्टेबल पासून सुरुवात करून पीएसआय,एपीआय व आत्ता एमपीएससीची परीक्षा देऊन पी आय झालेले आसनखेडा येथील भूमिपुत्र मंगेश भीमराव बोरसे यांचा व त्यांच्या समवेत सोबतच स्पर्धा परीक्षेच्या एकच बॅचमध्ये पी आय झालेले दादासाहेब फाळके यांचाही असा जाहीर नागरी सत्कार पाचोरा भडगाव मतदार संघातील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जि प सदस्य बापूसाहेब पदम पाटील, माजी सभापती नितीन दादा पाटील,नगरसेवक विकास पाटील सर यांनी ही त्यांचा सत्कार केला या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. यशवंत पवार यांनी केले याप्रसंगी मनोगत पर भाषणांमध्ये मान्यवर दिलीप भाऊ वाघ,विकास पाटील सर नितीन दादा तावडे,पोलीस निरीक्षक मंगेश पाटील,पोलीस निरीक्षक दादासाहेब एडके यांनी संयुक्तरित्या केलेल्या मनोगतातून गावाच्या विकासासाठी सर्वांनी राजकारण विरहित समाजकारण साठी एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास कसा साधावा याबरोबरच गावात अत्याधुनिक व्यायाम शाळा,डिजिटल वाचनालय, शेती सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करणे व तरुणांनी फक्त मिलिटरी भरती,पोलीस भरती साठीच प्रयत्न न करता एसटीआय,एसएससी,एमपीएससी,यूपीएससी,बँकिंग,रेल्वे,एअर फोर्स, नेव्ही यासारख्या स्पर्धा परीक्षा देऊन क्लासवन अधिकारी व्हावे त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी व अभ्यास करावा व आपल्या गावाचे व आपल्या कुटुंबाचे व देशाचे नाव मोठे करावे असे या प्रसंगी आपापल्या मनोगतातून व्यक्त केले यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पीआय मंगेश बोरसे पाटील यांनी दिले याविषयी प्रसंगी त्यांचा व त्यांच्या कुटुंबातील आई वडील भीमराव पाटील व सौ. गोजारबाई यांचा ही सत्कार गावातील सरपंच इंदिरा ताई बबन पाटील व उपसरपंच कल्पेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पितांबर महारु पाटील,रंगराव नामदेव पाटील,कैलास पाटील,अमृत वामन पाटील,बाबूलाल खंडू पाटील,बाबाजी पाटील बी. टी. पाटील,पाटील डॉक्टर,गावातील ग्रामस्थ व तरुण मित्र मंडळ यांनी सहकार्य केले.