प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांमध्ये समाधान अमोलभाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने मिळाली नुकसान भरपाईची रक्कम

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांमध्ये समाधान
——————————————————-
पुन्हा एकदा शेतकरीपुत्र अमोलभाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने मिळाली नुकसान भरपाईची रक्कम.
———————————————————
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सँपल सर्व्हे व वैयक्तिक नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात

पाचोरा —

पाचोरा व भडगाव तालुक्यातील प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१ अंतर्गत प्रमुख पिके (कापूस,उडीद, मूग,सोयाबीन, इ.) पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाच्या खंड (Gap)मुळे, तसेच नंतर झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणे बाबत व प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत होणे बाबत मा.जिल्हाधिकारी सो.यांच्या सह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व मा.प्रांताधिकारी पाचोरा भाग,पाचोरा आणि मा.तहसीलदार पाचोरा,यांना दिनांक ३०/०९/२०२१ रोजी निवेदन देऊन,या अनुषंगाने संबंधित विमा कंपनी ICICI Lombard General Insurance Company Ltd. यांनी तात्काळ नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी आग्रही मागणी अमोलभाऊ शिंदे यांनी केली होती.त्या अनुषंगाने आजपासून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक *शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात सँपल सर्व्हे व वैयक्तिक नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून अमोलभाऊ शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने रक्कम मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे*

पाचोरा व भडगाव तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे सॅम्पल सर्वेनुसार चे नुकसान भरपाई व वैयक्तिक नुकसानीची नुकसान भरपाई अजून पर्यंत जमा झाले नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या बाबत वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार करून दि.27 जानेवारी 2022 पासून
भडगाव तालुक्यातील 584 शेतकरी रक्कम रू.1920528/-
* पाचोरा तालुक्यातील 3876 शेतकरी रक्कम रू.15929900/-
प्रमाणे नुकसान भरपाई वितरित होण्यास सुरुवात झाली आहे.
सदरील नुकसान भरपाईची रक्कम सॅम्पल सर्व्हे व वैयक्तिक नुकसान भरपाईपोटी मंजुर झालेले आहेत.
नुकसान भरपाई मिळवुन देण्यासाठी अमोलभाऊ शिंदे यांनी केलेला पाठपुराव्याबद्दल शेतकऱ्यांनी अभिनंदन करीत आभार व्यक्त केले आहे.