अखेर ६व्या दिवशी पाचोरा जागृत जनमंचचे उपोषण खासदार साहेबांनी सोडवले

अखेर ६व्या दिवशी पाचोरा जागृत जनमंचचे उपोषण खासदार साहेबांनी सोडवले!

भडगाव पाचोरा दरम्यान तितूर नदीजवळ भडगाव कडून येणारा रस्ता अचानक थांबला. आणि पुढे नदीची २०फूट खोल खाई.भडगाव कडून वाहन आले कि सरळ खाईत जाऊन पडत असे.काही तर उजवीकडे वळून विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाला ठोकत.असे एकूण ४० अपघात झाले. पैकी १२ लोक मरण पावले.आताच १९जानेवारीला नाचणखेडा चा १९वर्षाचा तरुण मुलगा याकारणे आपघाताने मेला.
या अर्धवट सोडलेल्या रस्त्यावर जळगाव जिल्हा जागृत जनमंच चे अध्यक्ष शिवराम पाटील व पाचोरा जागृत जनमंच चे अध्यक्ष निलकंठ पाटील यांनी एक महिन्यापूर्वी व्हीडीओ चित्रण घेऊन ही समस्या प्रसारीत केली होती. कोणी दखल न घेतल्याने २४ तारखेपासून अपघात स्थळी निलकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी उपोषण सुरू केले.
धुळे व जळगाव चे संबंधित अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.पण प्रत्यक्ष जागेवर काम अर्धवट सोडल्याचे लक्षात आल्याने संघटना अडून बसली.
आज खासदार महोदय मा.उन्मेष पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.जागेची पाहाणी केली. उद्याच पुलाजवळचे काम सुरू करण्याचे आदेश अभियंत्याला दिले.यावर संघटनेच्या नेत्यांचे समाधान झाले.
निळकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी मा.खासदार दादासो. उन्मेश पाटील यांच्या हस्ते आज साडेतीन वाजता उपोषण सोडले. शिवराम पाटील व ईश्वर मोरे यांनी आधिकारी व नेत्यांची सुत्रे हलवली.खासदार पाटील साहेबांनी रस पाजून सोडवले. आमदार किशोर पाटील व अमोल शिंदे यांनी याकामी सहकार्य केले.प्रसार माध्यमांना राकेश वाघ यांनी इतिवृत्त कळवले. धन्यवाद.