पाचोरा जामनेर (पि.जे.) गाडी बंद करु नका ती पूर्ववत सुरू करावी
युवा नेते अमोल भाऊ शिंदे यांनी दिले
खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या मागण्यांचे निवेदन
——————————————-
जनरल मॅनेजर साहेब मा.श्री.अनिलकुमार लाहोटी यांची पाचोरा घेतली भेट
——————————————-
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी तात्काळ रेल्वे तिकिट, पासेस सुरू करण्याची फोनवरून जी एम् साहेबांकडे केली मागणी
———————————————-
पाचोरा – मतदारसंघातील आपल्या मध्य रेल्वे मार्गावर चाळीसगाव पाचोरा तसेच जळगाव ही तिन जंक्शन स्टेशन तसेच चाळीसगाव येथून धुळे, जळगाव येथून सुरत आणि पाचोरा येथून जामनेर जाण्यासाठी रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाचोरा जामनेर ही पि जे गाडीला नविन मार्गाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट रेल्वे विभाग करीत असुन याला *माझा स्पष्ट विरोध आहे*. याकरिता *आहे त्या रेल्वे मार्गाचे नूतनीकरण करून तातडीने ही पि.जे. रेल्वे सेवा सुरू करावी. अशी खासदार उन्मेश दादा पाटील यांची निवेदन वजा मागणी* जी एम अनिलकुमार लाहोटी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे अशी मागणी युवा नेते तथा पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली आहे.
खासदार उन्मेश दादा पाटील हे पक्षाच्या पूर्वनियोजित जबाबदारी मुळे उपस्थित राहू शकले नाही. त्यांनी दिलेल्या *मागणीचे निवेदन जी एम अनिलकुमार लाहोटी साहेबांना यांना दिले अशी माहिती देखील अमोल शिंदे यांनी यावेळी दिली. त्यांच्यासोबत झेड आर यू सि सी सदस्य सदाशिव आबा पाटील, डी आर यू सी सी सदस्य संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती* होती.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात यांनी प्रमुख आठ मागण्या केल्या असून यात प्रामुख्याने पाचोरा जामनेर ही पि जे गाडीला नविन मार्गाच्या नावाखाली बंद करण्याचा घाट रेल्वे विभाग करीत असुन याला *माझा स्पष्ट विरोध आहे*. याकरिता आहे त्या परिस्थितीत नूतनीकरण करून तातडीने पि जे गाडी प्रवाश्यांच्या सेवेत रुजू करा. यासह पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
२) मध्य रेल्वे मार्गावर चाळीसगाव जवळील पिंपळगांव रोहिणी अंडरपास (sabway) , पाचोरा जवळील भातखंडे अंडरपास (sabway), धुळे मार्गावरील जामदा अंडरपास (sabway) यासारख्या *जवळपास सर्वच अंडरपास (sabway) यांचे डिझाइन चुकीचे असून, जमीन अधिग्रहण करतांना देखील अक्षम्य चूक करणाऱ्या संबधित यंत्रणेचे चौकशी होवून कारवाई व्हावी*. या अंडरपास (sabway) खाली वर्षभर तिन ते चार फूट पाणी साचते येथुन प्रवास करणाऱ्या पादचारी आणि दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या इंजिन मध्ये पाणी जावून त्या बंद पडतात . ही ग्रामस्थांची वर्षभर होणारी अडचण दूर करावी. *अन्यथा मला या परिसरातील ग्रामस्थांसह आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल*.
३) नांदगांव, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव येथे दररोज हजारो चाकरमानी, अधिकारी, कर्मचारी व्यावसायिक, विद्यार्थी , रुग्ण यांना सोयीची असलेली *लोकप्रिय गाडी भुसावळ नाशिक शटल बंद आहे*. ही सेवा पुन्हा मेमु स्वरूपात सूरु करावी आणि यासाठी मंथली सिझन तिकीट (MST) आणि जनरल (नियमित) तिकीट मिळावे यासाठी आजच आदेश द्यावेत.इगतपुरी भुसावळ मेमु ( 11119), चाळीसगाव धुळे मेमू (01303) या दोन गाड्या सद्यस्थितीत सूरु आहे. या धर्तीवर *जुन्या शटल गाडीच्या वेळापत्रकानुसार ही नविन मेमुगाडी सुरू व्हावी*.
४) म्हसावद , कजगाव आणि नगरदेवळा ही पन्नास हजार लोकसंख्येची गावांना नविन थांबे देण्यात यावे. यात प्रामुख्याने
A) म्हसावद येथे प्रायोगिक तत्वावर हुतात्मा एक्सप्रेस सूरु करण्यात आली माञ तिकिट विक्री नसतांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. तिकिट विक्री नसल्याने उत्पन्न मिळणार नाही हे साधे गणित असताना आणि ही प्रशासनाची चूक असताना हे कारण दाखवत हा थांबा बंद करण्यात आला होता. तो पूर्ववत सुरू करावा.
B) कजगाव येथे महाराष्ट्र एक्सप्रेस हा नविन थांबा मिळावा आणि नगरदेवळा येथे हुतात्मा एक्सप्रेस गाडीला नविन थांबा मिळावा यासाठी तातडीने आदेश द्यावेत.
५) चाळीसगाव, पाचोरा येथे नविन एक्सलावेटर (सरकता जिना) आणि ज्येष्ठांसाठी लिफ्ट बसविण्यात यावी.
६) चाळीसगांव येथील नविन पादचारी पुलाचे काम सुरू असून त्यांची चढउतार करण्याची जागा तांत्रिक आणि प्रवाशी हिताच्या दृष्टीने चुकली असुन ती बदलविण्यात यावी.
७) रोहिणी रेल्वे स्टेशन वर पॅसेंजर गाड्या थांबत असल्याने या गावाचा आणि परिसरातील प्रवाश्याची मोठी सुविधा उपलब्ध होती. माञ गेल्या काही वर्षांपूर्वी हे स्टेशन बंद करण्यात आले होते. माञ आता नविन स्टेशन दीले जात असताना बंद करण्यात आलेले रोहिणी रेल्वे स्टेशन पुन्हा सूरू करण्यात यावे आणि वाढत्या दळणवळणाचा रेल्वेने लाभ घ्यावा.
८) भुसावळ रेल्वे स्टेशन व जळगाव रेल्वे स्टेशन च्या तुलनेत जळगाव रेल्वे स्टेशन येथे सर्वाधिक उत्पन्न देणारे स्टेशन म्हणून भुसावळ पेक्षा सरस आहे असे असताना भुसावळ रेल्वे स्टेशनच्या तुलनेत जळगाव रेल्वे स्टेशन येथे कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या संख्येने अपूर्ण असल्याने प्रवाशांना सेवा सुविधा मिळण्यात कर्मचाऱ्यांना ताण पडतो परिणामी प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागते या अनुषंगाने जळगाव स्टेशन वर तातडीने अपेक्षित रेल्वे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रवाशांचे होणारे हाल थांबविण्यात यावे याबाबत आपण तातडीनं कार्यवाही करावी. असे निवेदनात म्हटले आहे. मतदारसंघातील वरील समस्यांबाबत आणि उपाययोजना बाबत आपण गांभीर्याने पावले उचला अशी अपेक्षा खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली असल्याचे अमोल शिंदे यांनी जी एम अनिलकुमार लाहोटी यांच्याशी बोलतांना सांगितले. यावेळी रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
झेड आर यू सि सी सदस्य सदाशिव आबा पाटील यांनी पाचोरा भेटीबद्दल जी एम अनिलकुमार लाहोटी यांचे स्वागत करुन आभार मानले.