व्हाइट वाटर रिव्हर राफ्टिंग’ भारतात ठरली पाचोर्याची पहीली कन्या
पाचोरा (प्रतिनिधी) – इंडियन मिनिस्ट्री अॉफ डिफेन्स अंतर्गत निमास संस्थेच्या विविध कोर्स मधील ” व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग” हा कोर्स करणारी भारतात सर्वात कमी वयाची पाचोर्यातील सहीष्णा सोमवंशी ही पहीली कन्या ठरली आहे.
भारताच्या डीरांग अरुणाचल प्रदेश आणि आसाम च्या सिमेवर भारतीय सैन्य दलाने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ माउंटनींग ए लीड स्पोर्ट्स (निमास) ही संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत या ठिकाणी भारतातुन विविध राज्यांतील महीला आणि पुरुष अकरा दिवसाचा कॅम्प करण्यासाठी जातात. यात आपत्कालीन परिस्थितीत उपयोग घेण्यासाठी भारतीय लोक सक्षम असावे म्हणून हा कॅम्प इंडिया मिनिस्ट्री अॉफ डेफेन्स ने बनवला असुन यात माउंटनींग, कुबा डायव्हिंग, पॅरा लायडींग, बायकींग, व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग आदी कोर्स केले जातात. येथे शुन्य तापमान असुन हा खडतर कोर्स पुर्ण करावा लागतो. टेन्ट मध्ये राहणे सैन्या प्रमाणे जेवण घेणे अतिशय थंड पाण्यात राफ्टिंग करावे लागते. यासाठी पालक मुलांना पाठवण्याचे धाडस करीत नाही. परदेशात अशा कोर्स ला खुपच महत्व दिले जाते त्यात जगात व्हाईट वाटर रिव्हर राफ्टिंग मध्ये इंडियन आर्मी एक नंबरवर आहे. त्यामुळे भारतीय सैन्यातील अनुभवी प्रशिक्षक कडुन हे सर्व कोर्स शिकवले जातात
भारतातुन पाचोर्यातील सहीष्णा सचिन सोमवंशी ही सर्वात कमी वयाची अठरा वर्षाची मुलगी म्हणून हा कोर्स केल्याची पहीलीच ठरली आहे तिने हा बहुमान खान्देश ला दिला आहे. तिच्या यशात तिचे पालक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी व आई सुप्रिया सोमवंशी आजोबा आजी यांचा सहभाग आहे
सहीष्णा सोमवंशी ही ज्या टिम मध्ये गेली त्यात अकरा महीला सदस्यांचा सहभाग होता. यात शुन्य तापमाना मध्ये हा खडतर कोर्स करावा लागतो. यात रेस्क्यू अॉपरेशन शिकवले गेले आहे. प्रशिक्षण घेतांना येथे वास्तव्य करणेही आव्हानात्मक आहे. तब्बल सहा ते सात हजार किमी चा प्रवास येथे जाण्यासाठी करावा लागतो
शहरात आगमन होताच सहीष्णा चे स्वागत दत्त कॉलनीत तिच्या निवासस्थानी रांगोळी सह फटाक्यांची आतषबाजी करुन करण्यात आले आहे.
प्रत्येक पालकाने आपल्या मुलांवर विश्वास ठेऊन हा कोर्स करण्यासाठी उत्तेजित करावे या कोर्स मुळे प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो येणाऱ्या काळात ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना मी मार्गदर्शन करेल असे सहीष्णा सोमवंशी हीने सांगितले असुन महाराष्ट्र सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांसाठी या कोर्स साठी अनुदान द्यावे जेणेकरून येणाऱ्या काळात विद्यार्थी युवक युवती मधील आत्मविश्वास वाढेल आणि चांगली भावी पिढी निर्माण होण्यासाठी मदत होईल अशी आशा सहीष्णा ने व्यक्त केली आहे. तिच्या यशाने कौतुक होत आहे