शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता-
आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्याने पाचोरा-भडगावात सोमवार पासून भरडधान्य खरेदीला होणार सुरुवात
पाचोरा (वार्ताहर) दि,२२ पाचोरा व भडगाव तालुक्यात पणन खरीप हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदीला सोमवार पासून सुरुवात होत असून विशेष बाब म्हणून पाचोरा व भडगाव येथील भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावीत या बाबत आ. किशोर पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.
भरड धान्य खरेदी केंद्र विशेष बाब म्हणून तात्काळ सुरू करण्याबाबत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी 17 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून विनंती केली होती.याची तात्काळ दखल झाल्याने खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले आहेत.
जळगाव जिल्ह्यात सन 2021 मध्ये उद्भवलेल्या अतिवृष्टी व वादळ या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. पाचोरा, भडगाव, जामनेर, चाळीसगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान देण्यात आले आहे परंतु या नुकसानी मधून वाचलेला उर्वरित सुमारे 30 ते 35 टक्के शेतमाल शेतकऱ्यांकडे पडून आहे सदरील शेतमाल शासनाने खरेदी केल्यास शेतकरी बांधवांना आर्थिक मदत होईल या भावनेतून आ.किशोर अप्पा पाटील यांनी पाठपुरावा केला होता.
चौकट – दरम्यान धान्यखरेदीचा शुभारंभ आ.किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते काटा पूजन करून करण्यात येणार असून पाचोरा येथे सकाळी दहा वाजता शासकीय गोडाऊन येथे तर भडगाव येथे शासकीय गोदाम येथे
सकाळी 11 वाजता खरेदीला सुरुवात होणार आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी व संबंधितांना निर्देश दिले आहेत.