आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटांमधील मंजुर विविध विकास कामांचे भुमिपुजन सोहळा झाला संपन्न !!
नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामाला झाली सुरूवात
जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्या निधीतुन अंदाजित सात कोटींचे विकासकामे झाले मंजुर
पाचोरा प्रतिनिधी : नांद्रा येथे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामाचे भुमिपुजन करण्यात आले.त्यानंतर कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटातील हडसण येथे रस्त्याचे भुमिपुजन संपन्न झाले आणि या भुमिपुजन सोहळ्याला सुरुवात झाली.
जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांनी त्यांच्या प्रयत्नाने व पाठपुरावा करून साडे सात कोटी रूपयांचे विकास कामे मंजुर झाले आहे.
यामध्ये – १) नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारती बांधकामासाठी – ४०० लक्ष रू*
*२) हडसन ते पहाण रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू निधी*
*३) हडसन येथे बंधारा बांधकाम करणे – ११ लक्ष रू*
४) हडसन मराठी शाळेत पेवर ब्लाॅक बसविणे – ४ लक्ष रू
*५) खेडगाव नंदीचे ते मोहाडी रस्त्यावरील दोन मोरींचे बांधकाम करणे – १४ लक्ष रू*
६) खेडगाव नंदीचे येथे पेव्हर ब्लॉक बसवणे ५ लक्ष रू
७) खेडगाव नंदीचे येथे सुलभ शौचालय बांधकाम करणे – ५ लक्ष रू
८) वेरूळी ते दुसखेडा रस्त्यावर मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
९) लासगाव येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – १० लक्ष रू
*१०) लासगाव ते बांबरूड राणीचे रस्ता डांबरीकरण करणे – २२ लक्ष रू*
११) लासगाव येथे भुयारी गटार तयार करणे – ६ लक्ष रू
*१२) लासगाव येथे लघु सिंचन बंधाराचे काम करने – २५ लक्ष रू*
*१३) परधाडे फाटा ते वडगाव टेक रस्ता डांबरीकरण करणे – २५ लक्ष रू*
१४) परधाडे येथे काॅंक्रीटीकरण आणि भुयारी गटार करणे – १० लक्ष रू
*१५) परधाडे येथे ३ शाळा खोली नव्याने बांधणे -२५ लक्ष रू*
१६) परधाडे येथे मोरी बांधकाम करणे – ८ लक्ष रू
१७) परधाडे येथे नवीन वस्तीत मोरी बांधकाम करणे – ७ लक्ष रू
*१८) दुसखेडा येथे समाज मंदीर व भुयारी गटार करणे -१० लक्ष रू*
१९) वरसाडे येथे समाजमंदिर व रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ७ लक्ष रू
*२०) कुरंगी येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे – १० लक्ष रू*
२१) कुरंगी येथे पाण्याची बस्की टाकी बसवणे आणि पाईपलाईन करणे – १० लक्ष रू
२२) डोकलखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण- ५ लक्ष रू
*२३) आसनखेडा येथे सिंचन बंधारा बांधकाम करणे -३० लक्ष रू*
२४) आसनखेडा येथे रस्ता काॅंक्रेटीकरण करणे – ६ लक्ष रू
*२५) गोराडखेडा येथे प्राथमिक आरोग्य उपचार उपकेंद्र दुरूस्ती करून देणे – ४ लक्ष रू*
*२६) सामनेर येथे अंगणवाडी बांधकाम करणे – ९ लक्ष रू निधी*
२७) सामनेर येथे रस्ता काॅंक्रेटीकरण व भुयारी गटार बांधकाम करणे – ७ लक्ष रू
२८) मोहाडी येथे नवीन सिंचन बंधारा बांधकाम करणे – ८ लक्ष रू
*२९) मोहाडी येथे रस्ता काॅंक्रेटीकरण भुयारी गटार बांधकाम करणे -१५ लक्ष रू*
*३०) पहाण आसनखेडा मोहाडी वरसाडे प्र.बो दुसखेडा येथे जि.प शाळा दुरूस्ती करून देणे- २८ लक्ष रू*
*३१) वडगाव टेक येथे हनुमान मंदीर व जलाल शहा बाबा मंदिर सुशोभीकरण करणे – १० लक्ष रू*
लवकरच या कामांना सुरुवात होईल.अध्यक्षीय भाषणात आमदार किशोरआप्पा पाटील यांनी विकास कामांविषयी माहिती दिली तर कार्येकर्ते यांना आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तयारीला आजपासुन लागुन जनजागृती करण्याचे सांगितले.लवकरच शिवसेना व युवासेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याचे संकेत दिले.यानंतर उपस्थित सर्वांसाठी जिल्हा परिषद सदस्य पदमबापु पाटील यांच्याकडुन स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.