ब्रिटिश कालीन काळात सुरू झालेली रेल्वे इतिहास जमा होणार का पुन्हा खासदारांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे जोरात धावणार

ब्रिटिश कालीन काळात सुरू झालेली रेल्वे इतिहास जमा होणार का पुन्हा खासदारांनी दिलेल्या आश्वासना प्रमाणे जोरात धावणार

पाचोरा जामनेर पी जे रेल्वे ही ब्रिटिशकाळापासून जवळ जवळ शंभर वर्षापासून पाचोरा ते जामनेर रोज दोन फेऱ्या होत होत्या या पी जे रेल्वेमुळे पाचोरा रेल्वे टेशन जंक्शन म्हणून ओळखले जात होते पाचोरा जामनेर दरम्यान अनेक छोटे-मोठे खेडे जोडलेले असून अनेक शाळकरी विद्यार्थी शेतकरी मजूर वर्ग व्यापारीवर्ग पाचोरा ते जामनेर अपडाऊन करीत असे यामुळे अनेक गोरगरिबांचे कमी तिकीट लागत असल्यामुळे फायदा होत होता ही रेल्वे म्हणजे गोरगरिबांची मायबाप होती परंतु कोरोना काळात ही रेल्वे बंद असल्यामुळे गोरगरीबांचे फार हाल होत होते कारण त्यांना पाचोरा ते जामनेर एसटी चे जास्त भाडे मोजावे लागत होते ही रेल्वे कोरोना काळ संपल्यानंतर चालू होईल अशी अपेक्षा होती पण ही रेल्वे बंद झाली अशी चर्चा सुरू झाल्यामुळे पाचोरा शहरातील जागृत नागरिक जागृत संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन ही रेल्वे पुन्हा कशी चालू होईल यासाठी पाचोरा व जामनेर शेंदुर्णी वरखेडी पहूर येथील नागरिकांनी प्रवासी संघटना तसेच व्यापारी एकत्र येऊन पाचोरा जामनेर रेल्वे बचाव कृती समिती स्थापन करून वेळोवेळी बैठका घेऊन रेल्वे संदर्भात चर्चा केली व भुसावळ येथील रेल्वे प्रबंधक डी आर एम यांना निवेदन दिले तसेच पाचोरा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय श्री किशोर आप्पा पाटील ,पाचोरा तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते माननीय श्री दिलीप भाऊ वाघ व पाचोरा तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे यांनी पाठिंबा जाहीर केला तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री उमेश दादा पाटील यांनी त्वरित लक्ष दिले व त्यांनी पाचोरा रेल्वे बचाव कृती समिती यास प्रत्यक्ष भेट देऊन सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वांच्या समोर आश्वासन दिले जर पी जे रेल्वे बंद झाली तर त्यासाठी मी स्वतः आंदोलनासाठी मैदानात उतरले मी पक्षभेद न करता तुमच्या सर्वांच्या सोबत आहे तुम्हाला ज्या ज्या अडचणी येतील त्या सोडविण्यासाठी मी प्रयत्न करेल असे त्यांनी पाचोरा रेल्वे कृती बचाव समिती आश्वासन दिले होते त्यानुसार पाचोरा बचाव कृती समिती हे भुसावळ येथील डीआरएम यांना भेटण्यासाठी पाचोरा येथील रेल्वे बचाव समितीचे अध्यक्ष माननीय श्री खलील दादा देशमुख श्री पप्पू भाऊ राजपूत श्री अरुण पाटील सर श्री सचिन राजपूत श्री देवीदास पाटील श्री सुधाकर सोनवणे व अशा अनेक सदस्य यांनी प्रत्यक्ष भेटून डीआरएम यांना निवेदन दिले त्यानंतर डी एम आर यांनी निवेदन केले त्या निवेदनानुसार असे लक्षात आले की बहुतेक पी जे रेल्वे चालू होणार नाही असे संकेत दिसत आहे त्यामुळे आज रोजी रेल्वे बचाव कृती समितीची तातडीची बैठक बोलावून खासदार माननीय श्री उन्मेश दादा पाटील यांनी दिलेले आश्वासन व आंदोलनासाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी नियोजित करण्यात आले यावेळी पाचोरा पी जे रेल्वे बचाव कृती समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते सर्वांचा एकच नारा पाचोरा जामनेर रेल्वे सुरू होईल याबाबत निर्धार करा.तसेच भविष्यात धरणे आंदोलन मोर्चा उपोषण गाव बंद रेल्वे रोको असे अनेक वेगवेगळे प्रकारचे आंदोलन होऊ शकता.