दिव्यांग सेवेसाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वर्धमान धाडीवाल सन्माननीत
चाळीसगाव प्रतिनिधी – येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच कोरोना काळात अनेक आरोग्यविषयक उपक्रम राबवून रुग्णांना मदत करणारे वर्धमान भाऊ धाडीवाल यांनी तालुक्यातील अनेक दिव्यांग बंधू-भगिनी यांना त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या उपयुक्त साहित्याचे वाटप करून तसेच त्यांना मानसिक आरोग्यविषयक सहकार्य करून दिव्यांगांच्या पुनर्वसन काव्यात मोलाचे योगदान दिल्याने त्यांच्या या दिव्यांग सेवेची दखल जिल्हा समाज कल्याण विभाग रेड क्रॉस सोसायटी आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांनी घेऊन आज दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर पंकज आशिया, जिल्हा समाज कल्याण अधिकारी रायसिंग साहेब, भरत चौधरी, गणेश कर, मीनाक्षीताई निकम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यामार्फत करण्यात आले होते.