नांद्रा येथे पुन्हा २१ तारखेला होणारे रास्ता रोको आंदोलन दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे अशोका बिल्डकोन विरुध्द आंदोलन

नांद्रा येथे पुन्हा २१ तारखेला होणारे रास्ता रोको आंदोलन दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे अशोका बिल्डकोन विरुध्द आंदोलन

नांद्रा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या समस्यां दुर करण्यासाठी 28 ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते परंतु कोरोणाच्या पाश्वभुमिवर व शेतकरी वर्गाचे चाललेले शेतीचे कामे व प्रशासनामार्फत मा.प्रांताधिकारी साहेब,तहसिलदार कैलास चावडेसाहेब,पोलिस निरीक्षक किसन नजन पाटिल यांच्या प्रमुख समवायातून व नांद्रा येथील शिष्टमंडळ, ग्राम पंचायत कमिटी चे विनोद तावडे,सुभाष तावडे ,उपसरपंच शिवाजी तावडे,किशोर खैरनार,आनंदा पेंटर,नितिनदादा तावडे ,पोलिस पाटील किरण तावडे,पञकार प्रा.यशवंत पवार,संतोष ब्राम्हणे,अभिमन पाटिल व ग्रामस्थ नांद्रा व राष्ट्रीय महामार्ग चे व्यवस्थापन अधिकारी बोरसे साहेब यांच्यात झालेल्या सौजन्यपुर्ण सांगोपाँग चर्चातून मा.तहसिलदार चावडेसाहेब यांच्या समोर त्यांच्या दालनात एक एक विषयावर चर्चा घडून आल्याने राष्ट्रीय महामार्ग चे समन्वयक बोरसे साहेब यांनी ही आपल्या कंपनी ची भूमिका मांडली त्याच बारोबर वरीष्टांच्या मार्गदर्शनाने २७ जूलै रोजी चर्चा झाल्यानंतर सर्व चर्चा सकारात्मक भूमिकातून सोडविण्यासाठी दि. २८ जूलै रोजी धूळे येथील राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी विभागीय अभियंता कल्याणी पाटिल आल्यावर पुन्हा सर्व विषयावर चर्चा करुन सर्व मागण्या लेखी मान्य करण्याच्या दिलेल्या आश्वासनामुळे नांद्रा येथे होणारे रस्ता रोको आंदोलन ग्राम पंचायत कमिटी नांद्रा व ग्रामस्थ यांनी तूर्त स्थगित केले होते.परंतु आता तब्बल तिन महिने होऊन ही कोणत्याही कामाचे आद्याप न झाल्याने नांद्रा ग्रामपंचायत कमिटी व नाँद्रा ञस्त ग्रामस्थांनी दि.२१ आॕक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता नांद्रा बसस्थानकावर रस्तारोको आंदोलनाचा पावित्रा घेतलेला असून अशोका बिल्डकोनचे कोणतेच वाहन रस्त्यावर फिरु देणार नसल्याचे आल्टिमेटम देण्यात आला आहे. नांद्रा येथिल सर्व साईडचे काम पाहणारे बोरसे साहेब यांचे आताच साईड बदल करुन दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याचे कारण काय?त्यांनी नांद्रा ग्राम पंचायत व ग्रामस्थाना दिलेले सर्व सुव्यव्थित करून देण्याचे आश्वासनाचे काय? अशा व विविध समस्या समस्या पैकी बसस्थानकावरील मुतारी बांधणे,दलीतवस्तीकडून गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाईप टाकणे ,प्राथमिक आरोग्य केंद्राचा रस्ता तयार करणे,विष्णूदास महाराजांच्या मठाकडे जाणारा रस्ता पाईप टाकून तयार करणे या सर्व विषयावारील दि.२७ व २८ जूलैच्या तहसिलदारसाहेब यांच्या दालनात झालेल्या सकारात्मक चर्चाला अशोका बिडकाॕन कडून खो..देण्यात आलेला असून दि.२१आक्टोबर रोजी होणाऱ्या रास्ता रोकोतून होणाऱ्या सर्व सार्वजनिक मालमत्तेचि नूकसानची सर्वश्री जवाबदारी अशोका बिल्डकाॕनचीच असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.