Covid 19 मध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या पत्नी, मुलगी यांच्यासोबत महिला बालकल्याण विभागाचा छळ
सविस्तर वृत्त असे की चींचपुरा तालुका पाचोरा येथील संदीप शिंदे यांचे covid 19 मुळे दिनांक 24/05/2021 रोजी जळगाव येथील रुग्णालयात निधन झाले. नंतर महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी यांनी चिरी मिरी चा व्यवहार करून त्यांची पत्नी पुढील लग्न करून 3.5 वर्षाच्या मुलगीच्या भविष्याचा कोणताही विचार न करता व मृत व्यक्तीच्या पत्नीचा जबाब किंवा विचारपूस न करता लालसे पोटी अहवाल परस्पर सासरच्या मंडळींच्या सांगण्यानुसार बनऊन सरळ सरळ वारस हक्क काढून पत्नीचा हक्क डावलण्याचा प्रयत्न स्वतः महिला व बालविकास विभागामार्फत केला गेला की काय?हे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. विधवा महिला लग्न करणार की नाही, हे सासऱ्याच्या सांगण्यावरून जर अधिकारी किंवा कर्मचारी अहवालात सांगत असतील तर किती मोठा अन्याय या विभागमर्फत महिला व लहान मुलांच्या भविष्यावर सुरू आहे याची कुजबुज जनसामान्यांमध्ये सुरू आहे.