पाचोरा येथे मनसेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद
पाचोरा आज दि.२८ ऑगस्ट रोजी स्वामी लॉन्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जळगाव लोकसभा कार्यकर्ता संवाद आयोजित करण्यात आलेला होता,त्या ठिकाणी मनसे चे महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय भोईटे साहेब यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले येणाऱ्या नगरपरिषद,पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक संधर्भात चर्चा केली. सर्व तालुक्यात गाव तिथे शाखा उघडण्याचे सागण्यात आले. लवकच जळगाव जिल्ह्यातील राहिलेल्या नियुक्त्या करण्यात येतील.असे म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री.प्रशांतबाबा पाटील,पाचोरा यांनी केले व पाचोरा तालुक्यातील पदाधिकारी शुभम अशोक पाटील,ज्ञानेश्वर ठाकरे,राजेंद्र पाटील, जितेंद्र नाईक,शिवम्ं देसले,शाम पाटील,निखिल शेळके,शुभम देसले,शुभम बोरसे, ज्ञानेश्वर भोई तालुक्यातील कार्यकर्ते व चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, एरोंडल, पाचोरा व भडगाव येथील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.