ए.एम.फाऊंडेशन अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या वतीने पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पाचोरा शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर मंडळींचे चर्चासत्र व चहापानाचा कार्यक्रम संपन्न

ए.एम.फाऊंडेशन अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांच्या वतीने पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पाचोरा शहरातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर मंडळींचे चर्चासत्र व चहापानाचा कार्यक्रम संपन्न

पाचोरा प्रतिनिधी :

आज पाचोरा शासकीय विश्रामगृह येथे शहरातील सर्व लहान-मोठे प्रतिष्ठित डॉक्टर मंडळींचा चर्चासत्र बैठक ए.एम फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

ए.एम.फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिलभाऊ महाजन यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात शहरातील प्रमुख ४० ते ५० डॉक्टर लोकांची उपस्थिती लाभली. प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.गेल्या दोन वर्षापासुन कोरोना काळात जीवाची बाजी लावुन कोविड योद्धा म्हणून सर्व डॉक्टर मंडळीने आपली सेवा बजावली श.शहरातील अनेकांचे प्राण वाचवले व समाजातील एक महत्त्वाचा घटक म्हणून एक वेगळी ओळख ह्या डॉक्टर मंडळांनी निर्माण केली. यासाठी अनिलभाऊ महाजन यांनी डॉक्टर मंडळींचा सत्कार केला.

सर्व डॉक्टर मंडळींना पूर्णपणे सहकार्य करू शासन प्रशासन दरबारी आपल्या समस्या मांडण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालय दरबारी जी काही मदत लागेल ती मदत सर्व परीने करू असे प्रतिपादन अनिल भाऊ महाजन यांनी यावेळी त्यांच्या मनोगतामध्ये व्यक्त केले. यावेळी सर्व डॉक्टर मंडळींना अल्पोहार-चहा घेतला. पाचोरा शहरात पहिल्यांदा डॉक्टर मंडळींसाठी अशा वेगळ्या पद्धतीने अनोखा चहापानाचा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्व डॉक्टर मंडळींनी अनिल भाऊ महाजन यांचे कौतुक केले. त्यांना धन्यवाद दिले. चर्चासत्र व चहापान बैठकीचे अध्यक्ष पाचोरा डॉक्टर असोसिएशन’चे अध्यक्ष डॉक्टर नरेश गवांदे हे होते.चेअरमन तथा प्रमुख मार्गदर्शक डॉ.अनिल दादा झवर हे होते.डॉ.जयंत पाटील ,डॉ.स्वप्नील पाटील , डॉ.भुषण मगर,डॉ.गोरख महाजन,डॉ.रुपेश पाटील डॉ.भरत पाटील यांच्यासह इतर सर्व डॉक्टर मंडळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले

सदर डॉक्टर मंडळींचे चर्चासत्र व चहापानाचा कार्यक्रमाला पाचोरा डाॕक्टर असोसिएशनचे चेअरमन डॉ.अनिलदादा झवर,प्रेसीडेन्ट डॉ.नरेश गवांदे , डाॅ.जयंत पाटील,डाॅ.भुषणदादा मगर,डाॅ.स्वप्निल पाटील,डाॅ.भरत पाटील,डाॅ.रूपेश पाटील, डॉ.अतुल महाजन,डाॅ.नंदकिशोर पिंगळे,डाॅ.प्रशांत पाटील,डाॅ.अजय परदेशी,डाॅ.राहुल झेरवाल ,डाॅ.संजय जाधव, डॉ.अविनाश पाटील,डाॅ.बापु बेंडाळे,डाॅ.अमोल जाधव,डाॅ.विरेंद्र पाटील,डाॅ.विजय पाटील
डॉ.दिनेश माळी.डाॅ.पवन पाटील ,डॉ.गोरख महाजन,गर्जा महाराष्ट्र न्युज’ समुह’चे राहुल महाजन,अजय जैस्वाल सह सर्व प्रतिष्ठित डॉक्टर मंडळींनी कार्यक्रमाला उपस्थिती लाभली. काही डॉक्टर मंडळी वेळे अभावी पोहचु शकले नाहीत.त्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या.अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला शेवटी अनिल भाऊ माझी यांनी सर्वांचे आभार मानले.