श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे निरोप समारंभ संपन्न

श्री.गो.से.हायस्कूल पाचोरा येथे निरोप समारंभ संपन्न

 

( पाचोरा प्रतिनिधी )  पाचोरा .ता.सह.शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से. हायस्कूल येथे आज दि. 29 एप्रिल रोजी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे सर यांची संस्थेच्या भडगाव येथील सौ.सु.गी.पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भडगाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याने निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन दादासो.श्री.खलील देशमुख व प्रमुख पाहुणे म्हणून तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो.श्री. वासुदेव महाजन उपस्थित होते. शाळेच्या वतीने पर्यवेक्षक श्री.ए.बी.अहिरे सर यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.शाळेचे उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील यांनी आपल्या प्रस्ताविकातून श्री.ए.बी.अहिरे सर यांनी केलेल्या उत्कृष्ट सेवा,अध्यापन व शालेय प्रगतीसाठी पर्यवेक्षक म्हणून केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख केला. मुख्याध्यापक श्री. एन.आर.पाटील सर यांनी देखील श्री.ए.बी.अहिरे. सर यांनी केलेल्या 29 वर्षाच्या सेवेमध्ये केलेले उत्कृष्ट अध्यापन व विद्यार्थ्यां प्रती त्यांनी केलेले कार्य याविषयी गौरवोद्गार काढले.

शिक्षक प्रतिनिधीं मधून श्री.आर.एन. सपकाळे सर यांनी एक हिंदी गीत सादर करून आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो. खालील देशमुख यांनी श्री.ए. बी.अहिरे सर यांच्या शिक्षक म्हणून सेवा करत असताना समाजसेवा, राजकारण व संस्थेने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल प्रशंसा पर मनोगत व्यक्त केले.

सत्कारास उत्तर देताना श्री.ए.बी.अहिरे सर यांनी संस्थेच्या

सर्व सन्माननीय पदाधिकारी यांचे पदोन्नती दिल्याबद्दल आभार व्यक्त करून मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला.

या कार्यक्रमास पर्यवेक्षिका सौ.अंजली गोहिल मॅडम, श्री.आर. बी.तडवी सर,तसेच तांत्रिक विभागाचे प्रमुख श्री. एस.एन.पाटील, किमान कौशल्य विभागाचे प्रमुख श्री.मनीष बाविस्कर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.एम.टी.

कौंडिण्य,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता पाटील,सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.आर.बी. बोरसे व आभार प्रदर्शन श्री.बी.एस.पाटील यांनी केले.