तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीस नेवासा न्यायालयाकडून जामीन मंजूर

तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील दुसऱ्या संशयित आरोपीस नेवासा न्यायालयाकडून जामीन मंजूर,प्रवरा संगम येथील नदीपात्रात सापडला होता म्रुतदेह

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलीसांची झोप उडवणाऱ्या व पाथर्डी आणि नेवासा तालुक्यातील पोलीसापुढे तपासाचे फार मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या तिसगाव येथील कल्याण मरकड खुन प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी इर्शाद जब्बार शेख यास नेवासा न्यायालयाकडून दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी जामीन मंजूर करण्यात आला आहे.पहिला संशयित आरोपी अमोल गोरक्षनाथ गारुडकर यास अगोदरच मार्च महिन्यात नेवासा न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. पंकज मगर या आरोपी बाबद मात्र न्यायालयाने काहीच निर्णय घेतला नाही. याबाबतची माहिती अशी की दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी रात्री ९ वाजता मयत कल्याण देविदास मरकड हा त्याचे जिवलग मित्र पंकज राजेंद्र मगर, आणि इर्शाद जब्बार शेख यांना भेटून येतो असे आपल्या पत्नीला सांगून घराबाहेर पडला होता.तो रात्रभर घरी न आल्याने आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा कोठेही ठावठिकाणा न लागल्याने त्याचा चुलत भाऊ प्रसाद मरकड याने कल्याण देविदास मरकड हा हरवल्या बाबद पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली होती. त्या नंतर ४ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता फिर्यादी यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने फोन करून सांगितले होते की तुमच्या भावाची मिसिंगची बातमी हाॅटसाप वर प्रसिद्ध झाली होती त्या अनुषंगाने नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील नदीपात्रात तुमच्या भावाच्या शरीर यष्टीशी मिळते जुळते प्रेत नेवासा पोलीसांना मिळाले आहे.तुम्हाला त्याचे फोटो व्हाटसाप वर टाकले आहेत.अशा प्रकारे माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी प्रवरा संगम येथील नदीपात्रात जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली होती आणि ते प्रेत ओळखले होते.त्या नंतर सदर तिन संशयित आरोपीच्या विरोधात दिनांक ५ नोव्हेंबर २०२४ रोजी नेवासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १०२९/२०२४ कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या फिर्यादीत नेवासा पोलिसांना आरोपींचा संशय आल्यामुळे कोणत्या तरी अज्ञात हत्याराने अज्ञात कारणास्तव फिर्यादी याच्या भावाचा खून केला अशा आशयाची फिर्याद नेवासा पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती.त्यानंतर नेवासा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलीसांच्या तपासात आढळलेला संशयित आरोपी नामे इर्शाद जब्बार शेख रा.तिसगाव ता. पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांनी ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख रा.जवखेडे खालसा तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांच्या मार्फत नेवासा येथील जिल्हा व सत्र न्यायालया समोर सुटकेसाठी आरोपीच्या वतीने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.सदर जामिनासाठी केलेल्या अर्जावर न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद होउन तो अर्ज न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींच्या काही अटी व शर्ती मान्य करून आरोपीच्या जामिनासाठी अर्ज मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट महेश तवले यांच्या मार्गदर्शनाखाली ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांनी काम पाहिले.असिफ शेख हे पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफभाई इस्माईल शेख यांचे लाडके चिरंजीव आहेत. वडीलांचा वकिलीचा यशस्वी वारसा मुलाने चालवून न्यायालयीन क्षेत्रात नाव उज्ज्वल केले आहे. एक संशयित आरोपी पंकज मगर बाबद मात्र नेवासा न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवली आहे. या यशस्वी वाटचालीमुळे नेवासा आणि पाथर्डी तालुक्यातील जवखेडे पंचक्रोशीत ॲडव्होकेट असिफ लतिफ शेख यांचें जोरदार स्वागत आणि कौतुक होत आहे.