कोपरे येथे १५ एप्रिल पासून मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन

कोपरे येथे दिनांक १५ एप्रिल पासून मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव आणि पाथर्डी तालुक्याच्या सिमेवर असलेल्या कोपरे येथे माता मळगंगा देवी यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.चैत्र पौर्णिमेच्या दिवशी माता मळगंगा देवीच्या काठीची विधीवत पूजा करण्यात आली आणि रंगीत उंच ध्वज उभारण्यात आला.तसेच गावातील अनेक घरातील सुवासिनी माता भगिनी मळगंगा देवीच्या मंदिरात अनुष्ठानासाठी ठाण मांडून बसलेल्या आहेत.मंगळवार दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी चार वाजता मळगंगा देवीच्या मंदिरात सर्व सुवासिनींच्या हस्ते वाजत गाजत मानाचा महानैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.तसेच रात्री ९ वाजता माता मळगंगा देवीच्या काठीची आणि पालखिची वाजत गाजत व शोभेच्या दारूच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.बुधुवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी गावातील हनुमान मंदीरा समोर ग्रामीण कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी चार वाजता जिल्ह्यातील नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. माता मळगंगा देवीच्या मंदिरात महीलांच्या जागरासाठी भारुडाचा कार्यक्रम होणार आहे अशी माहिती यात्रा कमेटीच्या वतीने देण्यात आली आहे. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त कोपरे ग्रामस्थ व यात्रा कमेटीच्या वतीने करण्यात आले आहे. यात्रा निमित्ताने माता मळगंगा देवीच्या मंदिरावर आकर्षक वीद्युत रोषणाई करण्यात आली आहे.