हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जवखेडेच्या कान्होबा यात्रेत पै.अनिल लोणारेचा पराभव करून देवा गुंजाळ यांनी ३१ हजाराची कुस्ती जिंकली

हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जवखेडेच्या कान्होबा यात्रेत पै.अनिल लोणारेचा पराभव करून देवा गुंजाळ यांनी ३१ हजाराची कुस्ती जिंकली

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या जवखेडेच्या कान्होबा उर्फ तांबुळदेव यात्रा महोत्सवातील कुस्त्यांच्या जंगी हगाम्यात प्रसिद्ध पैलवान अनिल लोणारे विरुद्ध पैलवान देवा गुंजाळ यांची एकतीस हजाराची ईनामी कुस्ती लावण्यात आली होती.ती ईनामी कुस्ती पैलवान अनिल लोणारे यांचा पराभव करून करून देवा गुंजाळ यांनी जिंकली.प्रारंभी सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ साहेब,विद्यमान सरपंच चारूदत वाघ, विशाल आंधळे,आणि जेष्ठ नेते शाबुद्दीनभाई शेख यांच्या हस्ते नारळ फोडून या हंगाम्याची सुरवात करण्यात आली.पैलवान शरद गवळी, कैलास मतकर, अनंत वाघ,ताजुद्दीन शेख, सुरेश वाघ यांनी कुस्तीतील पंच म्हणून काम पाहिले.ॲडव्होकेट निसारभाई शेख यांनी विजयी मल्लांना कुपन दिले तर जेष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट लतिफभाई शेख यांनी रोख ईनामी रकमा दिल्या.या हंगाम्यात एकूण १ लाख २० हजार २०० रुपये किमतीच्या एकूण वीस इनामी कुस्त्या अगोदरच पत्रके काढून जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये गौरी मुखेकर आणि विशाखा चव्हाण यांची अनेक डाव प्रतिडाव टाकून लक्षवेधी कुस्ती झाली.आणि इतरही अनेक महिलांच्या कुस्त्या झाल्या.ईतरही अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या कुस्त्या झाल्या.पराभूत झालेल्या पैलवानांना सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघ साहेब यांनी प्रवासभत्ता म्हणून पन्नास,शंभर,दोनशे रुपये देऊन त्यांची बोळवण केली.ॲडव्होकेट वैभव आंधळे यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून देत सत्कार केला.यावेळी ईसाक शेख, इरफान पठाण, युवा नेते अमोल वाघ,नुरबाबा शेख,नजमोद्दीन शेख, हरीभाऊ जाधव,भैय्या दुकानदार, झाकिर शेख, संजय जाधव, दिपक जाधव यांनी विशेष सहकार्य केले.गावातील गावठाणात सायंकाळी चार वाजता सुरू झालेला हंगाम रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होता.आतापर्यंत कधी नव्हे तेवढं या वर्षी पंचांनी कुस्त्यांचे अतिशय तगडं नियोजन केल्यामुळे कुस्त्यांच्या फडात अजिबात अडचण आली नाही.भाविकांनी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत जाउन पैठण येथुन कावडीने आणलेल्या पाण्याने मीरी रोडवरील कान्होबा उर्फ तांबुळदेवाला महाजलाभिषेक करण्यात आला.रात्री संदल मिरवणूक काढण्यात आली होती.पाडव्यच्या दुसऱ्या दिवशी रात्री ढोल ताशा आणि बॅन्ड पथकासह वाद्यांच्या दणदणाटात तोफांच्या सलामीत व फटाक्यांच्या आतषबाजीत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती.देवाला फुलांच्या माळा आणि चादरी अर्पण करण्यात आल्या.शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुनिल पाटील यांच्या उपस्थितीत आणि पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दंगल नियंत्रण पथकाने व प्रल्हाद पालवे,भिंगार दिवे,पोपट आव्हाड यांच्या सह पाथर्डी तालुक्यातील अनेक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.