मढीतील हाऊसफुल्ल गर्दीत मानाच्या पाच कावड काठ्याच्या निशाण भेटीने फुलरबाग यात्रा संपन्न
(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढीच्या कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने वाजत गाजत काढण्यात आलेल्या पितळी घोड्याच्या आणि पैठण येथुन कावडीने पाणी आणण्यासाठी गेलेल्या पाच गावांतील मानाच्या कावडींच्या हाऊसफुल्ल गर्दीतील निशाण भेटीने फुलरबाग यात्रा संपन्न. नवनाथांच्या पैकी कानिफनाथ महाराज हे फाल्गुन रंग पंचमीच्या दिवशी समाधीस्त झाले.आणि फाल्गुन अमावस्येला प्रकट झाले म्हणून या दिवशी फुलरबाग यात्रा भरते आणि नाथांच्या समाधिला पैठण येथुन कावडीने पाणी आणून महाजलाभिषेक करण्यात येतो. या दिवशी पंचक्रोशीतील पाच गावांतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते .या मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडीमध्ये मढी, पैठण, सावरगाव, मीरी या चार कावडी आणि कासार पिंपळगाव,सुसरे, साकेगाव, हात्राळ, माळी बाभुळगाव, निवडुंगे, मिळून एक अशा पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या काठ्यांचा या कावडीमध्ये समावेश होता.या निशाण भेटीच्या वेळी काही वर्षांपूर्वी तुफान हाणामारी होउन एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता म्हणून निशाण भेटीच्या वेळी पाच मानाच्या समजल्या जाणाऱ्या कावडीच्या निशाण काठ्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते.आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तात गडावरून वाजतगाजत निघालेल्या घोड्याला स्पर्श करीत ही निशाण भेट होताच आपोआप गडावरून वाजतगाजत निघालेला नाथांचा घोडा मागे वळून मार्गस्थ होतो.या निशाण भेटीचा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी परीसरात भाविकांची तुफान गर्दी जमा झाली होती.मढी यात्रेतील फुलरबाग हा शेवटचा टप्पा होता.गुढीपाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे नाथांच्या समाधिला महाअभिषेक होउन पुन्हा उटणे लावून नव्याने कपडा चढविला जातो.आणि नाथांचा दर्शनासाठी खुला करण्यात आलेला गाभारा बंद केला जातो.यावर्षीच्या तुफान गर्दीमुळे मढीला येणारे सर्व रस्ते तुडुंब भरून वाहनांच्या तिनं चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. प्रशासनाने ठरवलेल्या एकेरी वाहतूकीचा पुर्णपणे बोजवारा उडाल्यामुळे भाविकांना रोखण्याचा प्रयत्न झाला. निवडुंगेतून आतमधे प्रवेश आणि तिसगाव मधून बाहेर पडणे असे ठरलेले असताना व्रुध्देश्वर आणि मायंबा गडावरून येणाऱ्या भाविकांमुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.तिसगावात ही ट्राफिक जाम झाली होती. तिसगावातील मढीला जाणाऱ्या कमाणी जवळ पोलीसांची राहुटी नसल्याने अनेक भाविक याच मार्गाने मढीकडे जात होते म्हणून दोन्ही कडून जाणाऱ्या एणाऱ्या भाविकांची तुफान गर्दी जमा झाली होती. प्रवाशांच्या सुरक्षेसाठीचा बोजवारा उडाला होता.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निशान भेटीच्या वेळी पाथर्डीतील दीडशे पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निशान भेटीच्या वेळी कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव,विश्वस्त,आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार व्यवस्थापक संजय मोहन मरकड हे आवर्जून उपस्थित होते. निशान भेटीच्या ठिकाणी लक्ष्मी माता चौकातील रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे अनवाणी पायाने निशाण डोक्यावर घेतलेल्या पोलिस प्रशासनाचे उन्हात फिरून चांगलेच पाय भाजले. या बद्दल पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे साहेब यांनी काही विश्वस्तांची चांगलीच कानउघाडणी करून झाडाझडती घेतली.पो.काॅं. भिंगारदीवे,पोपट आव्हाड, गुट्टे साहेब,बडे,मासाळकर, अमोल पवार,गोपनिय विभागाचे प्रमुख नागेश वाघ यांच्या सह अनेक पोलिस आणि होमगार्ड उपस्थित होते.नाशिकच्या सोनाली पाटील यांच्या तमाषा लोकनाट्य मंडळाकडून उपस्थित भाविकांची चांगली करमणूक झाली.