जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव दि. 24 मार्च – माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थितीमध्ये आधार केंद्र नाही अश्या 25 महसुल मंडळ तसेच ७ शहरी भाग मध्ये आधार केंद्र वाटपा बाबत दिनांक २४ मार्च रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भात मात्र आपले सरकार केंद्रचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत वेबसाइट www.jalgaon.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना, पात्रतेचे निकष, रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती प्राप्त करून घ्यायची आहे.
इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत संध्याकाळी 5.00 पर्यंत https://forms.gle/Bn1s4filH1SDDQB97 या गूगल लिंक वर पाठवावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.