जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

जिल्ह्यातील धर्मादाय संस्थांनी पूरग्रस्तांसाठी मदत करण्याचे धर्मादाय आयुक्तांचे आवाहन

जळगाव, दि. 31 – राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली व इतर जिल्ह्यात आलेल्या महापूरामुळे मोठी जिवीतहानी व नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त व बाधितांना मदतीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे.

महापूर, दरड कोसळल्यामुळे व लॉक डाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तु, अन्नधान्य, औषधोपचार आदि मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक स्वरुपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.

अशावेळी सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व या उद्देशाने स्थापन झालेल्या राज्यातील सर्व धर्मादाय संस्था (ट्रस्ट) यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. जेणेकरुन गरजूंना शक्य ती मदत करता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधुन गरजूंना धर्मादाय संस्था यांनी शक्य ती मदत करावी. असे आवाहन प्र. श्रा. तरारे, धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे.

तसेच आर्थिक स्वरुपात मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आर्थिक मदत खालील बँक खात्यावर चेक किंवा डी.डी. व्दारे शक्य तितक्या लवकर द्यावी.

*मुख्यमंत्री सहाय्यता निधी बॅक खात्याचा तपशील*

मुख्यमंत्री सहाय्यता निधी –
बचत खाते क्रमांक- 10972433751, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई-400 001,
शाखा कोड- 00300,
आयएफएस कोड – SBIN0000300 असे आहेत.

तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व धर्मादाय संस्थांनी जिल्हाधिकारी यांचेशी संपर्क साधून आवश्यक ती मदत करावी. तसेच जास्तीत जास्त आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस करावी. असे धर्मादाय उप आयुक्त (प्र.) जळगाव विभाग, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्व्ये कळविले आहे.