अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती शताब्दी महोत्सवा निमित्ताने यशवंतसेना आणि जयमल्हार सामाजिक संस्थेतर्फे ६१ व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, जिल्हा प्रतिनिधी सुनिल नजन यांना “आदर्श क्रुतीशील पत्रकार”पुरस्कार प्रदान
(अहिल्यानगर स्पेशल प्रतिनिधी) राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती शताब्दी महोत्सव वर्षा निमित्ताने यशवंतसेना आणि जयमल्हार शैक्षणिक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्रातील ६१ व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. हा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा अहिल्यानगर येथील स्वस्तीक चौकातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला.प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.नंतर संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या विकास कामाची माहिती दिली.प्रथम अहिल्यानगर जिल्ह्याचे संपादक,स्पेशल क्राईम रिपोर्टर आणि जिल्हा प्रतिनिधी सुनिल नजन यांना”आदर्श क्रुतीशील पत्रकार”म्हणून सन्मानित करण्यात आले.अ.नगर जिल्ह्यातील यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष विजयराव तमनर आणि जयमल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल जाडकर साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प.यशवंत महाराज थोरात,नगरचे पोलिस उपनिरीक्षक एकनाथ आव्हाड, मुख्याध्यापक अशोक सुर्यवंशी,जेष्ठ नागरिक संघटनेचे शब्बीरभाई पठाण,मुंबईचे डॉ. नितीन खरात सर,प्रा.यादव सर,डॉ शिंदे,गवते सर, ॲडव्होकेट अनुराधा येवले मॅडम,चेरमन रंगनाथ तमनर इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणाऱ्या गुणवंत व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कारा मध्ये शाल,बुके,ट्राॅफी,आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.प्रथम अहमदनगर जिल्ह्याचे चिफब्युरो आणि स्पेशल क्राईम रिपोर्टर “सुनिल नजन”यांना”आदर्श क्रुतीशील पत्रकार” हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामांतर करण्यासाठी जी रथयात्रा काढली होती त्या रथयात्रेचा थेट सरकार दरबारी मुख्यमंत्र्यांपर्यंत आवाज उठवला होता.आणि जिल्ह्याच्या नामांतर क्रुतीसमितीला यश प्राप्त करून दिले होते.पत्रकाराच्या लेखणीपुढे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा झुकावे लागले होते.म्हणून १)पत्रकार सुनिल नजन यांना हा “क्रुतीशील आदर्श पत्रकार” राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.२)डॉ. नितीन खरात मुंबई,३)कु.लेखा ओंबळे,मुंबई,४)गंगाधर आंबवणे मुंबई,५)ह.भ.प.प्रेमानंद महाराज शास्त्री आणे-जुन्नर,६)सौ.रश्मी कडू,कोपरगाव,७) शब्बीरखान पठाण कर्जत,८)सय्यद महमुद कर्जत,९)योगेश गलांडे नाशिक,१०)सुभाष दिवटे महाराज, बर्हाणपूर-शेवगाव,११) कल्पना जगताप नाशिक,१२)राजेंद्र काळे,राशिन-कर्जत, १३)चक्रपाणी चाचर,बारामती,१४) ह.भ.प.योगिराज महाराज मेरड शेवगाव,१५)राजेंद्र जाधव राशिन-कर्जत,१६) भाऊसाहेब ओहळ नाशिक,१७)सुभाष अडावतकर,मुंबई १८)ज्वाला कांबळे, बेलापूर,१९)सुधाकर घोडके,श्रीगोंदा,२०) सर्जेराव यादव श्रीगोंदा,२१) संजय वडीतके, श्रीरामपूर,२२)डॉ. अनिल धनगर नंदुरबार,२३)पै.नाना डोंगरे निमगाववाघा -नगर,२४)जयराम शिरोळे,श्रीरामपूर,२५) हेमलता गीते, अहिल्यानगर,२६) सरोज आल्हाट अहिल्यानगर,२७) त्रिशला भोसले देऊळगाव-श्रीगोंदा, २८)कपिलेश्वर उल्हारे खांडगाव-श्रीगोंदा,२९) डॉ.सय्यद आर्शिया, खुलताबाद,३०)प्रशांत चव्हाण,काष्टी-श्रीगोंदा, ३१)शर्मिला नलावडे कोरेगावभीमा,३२) चंद्रकांत गव्हाणे कोरोगावभिमा,३३) बाळासाहेब यादव, श्रीगोंदा,३४)संगिता कोळेकर,चिंचोली- गंगापूर,३५)प्रमोद डफळ,राहुरी,३६) जयसिंग निंबोरे, नागापूर,३८)नयना कोल्हे, मिरजगाव-कर्जत, ३९)अफसर शेख अहिल्यानगर,४०) रावसाहेब ठोंबे, अहिल्यानगर,४१)शरद कासार,वाळकी-नगर, ४२)जयश्री काळे, पंढरपूर,४३)शरद सातपुते,कोळगाव- कर्जत,४४)डॉ.प्रसाद शिंदे,मिरजगाव,४५) ओंकार महाराज वैद्य, आळंदीदेवाची,४६) संतोष रुपनर,निमगाव घाणा,४७)कु.स्वराली थोरात,ढवळपुरी -पारनेर,४८)मच्छिंद्र व्यवहारे,ढवळपुरी -पारनेर,४९)ह.भ.प. यशवंत महाराज थोरात ढवळपुरी -पारनेर,५०)केशव चेमटे भाळवणी- पारनेर,५१)हरीदास पावणे,दत्तवाडी- जामखेड,५२)दिपक जाधव,नाशिक,५३) लक्ष्मण मुळीक, लोणीमसदपूर- कर्जत,५४)निशा बावडकर/गुंड बाभुळगाव खालसा,५५) राजेंद्र तिडके,बीड,५६) बापुसाहेब सरोदे कोमाळी-खेड,५७) राहुल थोरवे आरोळी,५८)डॉ.शिल्पा देशपांडे खुलताबाद,५९)ज्योती पवार,चितळी,६०) अमोल जाधव जवखेडे,६१)श्रीमती राहत शेख,इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रातील एकसष्ट जणांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.या प्रसंगी शोभा विवेक पंडित,भास्कर पगारे,राहुल कोरडे,रामचंद्र थोरात, डॉ.शिंदे,यांच्या सह अनेक मांन्यवर उपस्थित होते.आभार सौ.जाडकर मॅडम यांनी मानले.