राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र मीडिया व पत्रकार प्रमुख पदी लोहारा येथील दिनेश चौधरी यांची निवड

राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र मीडिया व पत्रकार प्रमुख पदी लोहारा येथील दिनेश चौधरी यांची निवड

 

 

लोहारा -:- ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्रच्या मीडिया व पत्रकार प्रमुख पदावर लोहारा येथील सामाजिक कार्यकर्ते व जेष्ठ पत्रकार श्री दिनेश सोनजी चौधरी (लोहारा,ता.पाचोरा )) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांचे समाजातील योगदान आणि सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री भटू पुंडलिक नेरकर चौधरी यांनी त्यांची निवड केली.

 

या निवडीबद्दल राष्ट्रीय ओबीसी महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख श्री अजय अशोक चौधरी (जामनेर).भटू पुंडलिक नेरकर, जेष्ठ पत्रकार महेंद्र शेळके, सुधाकर चौधरी(मेणगाव ),लोहारा येथील तेली समाज अध्यक्ष, समाज बांधव,तसेंच अनेक पत्रकार बांधवांनी दिनेश चौधरी यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वामुळे ओबीसी समाजाचे प्रश्न अधिक प्रभावीपणे प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजात आनंदाचे वातावरण आहे.