जळगाव जे डी सी सी बँकेचा चा भोंगळ कारभार? व्याज भरण्यास सक्ती करत असल्याने शेतकऱ्यांची तक्रार
अख्या जगाचा पोशिंदा शेतकरी…!!! या शेतकऱ्याना न्याय मिळेनासा झालाय. सर्व उद्योग व्यवसाय, संपूर्ण भारताची अर्थ व्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून असते मात्र त्या तुलनेत शेतकऱ्याला कुठलाही मोबदला लाभ मिळत नाही.
सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या त्या शेतकऱ्यांपर्यंत येत नाही काही घटक जाणीवपूर्वक पोहचू देत नाहीत. असाच काहीसा प्रकार सध्या महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यात झाल्याचा दिसतो. जळगांव जे डी सी सी बँक ने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे.
*नेमक काय घडलं*
सन 2022-23 या वर्षी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जळगाव जेडीसीसी बँकेकडून पीक कर्ज घेतले होते. त्यानंतर बँकेने 2024-25 या वर्षामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज दिले. 2024 सालच्या पीक कर्जाची वसुली करतेवेळी बँकेने सन 2022- 23 या वर्षांमध्ये घेतलेल्या कर्जाचे व्याज सुद्धा जमा करण्याचे काही शेतकऱ्यांना आदेश दिले आहेत. सरकारने व्याज माफ करून दिले असताना सुद्धा जाचक अटी शर्ती टाकून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. जाचक अटींचे पत्र देत शेतकऱ्यांना व्याज माफ न करता ते भरण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
*नेमक्या काय अटी आहेत पत्रामध्ये जाणून घेऊयात*
1) शेतकरी सभासदांचे आधारकार्ड गत 10 वर्षात अपडेट केलेले नाही. आधार कार्डची ई केवायसी केलेली नाही.
2) सभासदांचे आधारकार्ड वरील नाव व जमिनीच्या 7/12 उताऱ्यावरील नावात फरक आहे.
3) सभासदांनी मोबाईल नंबर खात्याला लिंक केलेले नाही
4) शेतकरी सभासदांचे वय जास्त असल्याने त्यांची ई केवायसी करतांना अंगठ्याचे ठसे येत नाहीत.
(5) शेतकरी सभासदांच्या जमिनी दोन वेगवेगळ्या गावात (शिवारात) असल्याने अपलोड होत नाहीत.
*शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न*
1) दहा वर्षापासून आधार कार्ड अपडेट नाही तर मग आपण 2022- 23, 2023- 24 यावर्षी कर्ज कसे दिले?
2) आधार कार्ड ची ई केवायसी करण्यासाठी बँकेने काय प्रयत्न केले.
3) जर जमिनीच्या 7/12 उतारावरील नावात फरक आहे तर मग कर्ज मंजूर कसे झाले
4) सभासदांच्या हाताचे ठसे येत नाही म्हणून बँकेने नवीन धोरण काय तयार केले? तरीसुद्धा कर्ज मंजूर कसे केले?
5) सभासदांचा मोबाईल नंबर खात्याला लिंक नसेल तर अकाउंट कसे उघडले? शेतकरी क्रेडिट कार्ड कसे दिले?
6) जर नंबर खात्याला लिंक नाही तर एटीएम मधून शेतकऱ्यांकडून पैसे कसे काढले जातात?
7) शेतकरी सभासदांच्या जमिनी दोन वेगवेगळ्या गावात असल्याने अपलोड होत नाहीत यात शेतकऱ्यांची काय चूक? यास शासकीय यंत्रणा जबाबदार आहे.
जाचक अटी टाकून शेतकऱ्यांची फसवणूक व पिळवणूक करण्यात येत आहे यासंबंधी अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या असता आपणास पूर्ण व्याज भरावे लागेल असे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.