मढीतील घाला हा मुस्लिम समाजावर नाही तर तो संविधानावर होता, समाजाला वाळीत टाकण्याचे काम मढीतुन सुरू झाले ते आम्ही खपवून घेणार नाही : नाशिर शेख

मढीतील घाला हा मुस्लिम समाजावर नाही तर तो संविधानावर होता, समाजाला वाळीत टाकण्याचे काम मढीतुन सुरू झाले ते आम्ही खपवून घेणार नाही : नाशिर शेख

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) पाथर्डी तालुक्यातील मढीतील घाला हा मुस्लिम समाजावर नाही तर तो संविधानावर होता. मुस्लिम समाजाला वाळीत टाकण्याचे काम मढीतुन सुरू झाले आहे ते आम्ही कदापिही खपवून घेणार नाही असा इशारा पाथर्डी तालुका काँग्रेस कमिटीने अध्यक्ष नाशिरभाई शेख यांनी दिला.ते शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पराभूत उमेदवार प्रतापराव ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पाथर्डी येथील संस्कार भवनात आयोजित करण्यात आलेल्या “आढावा बैठकीत “बोलत होते.मढीच्या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना बंदीच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी प्रताप काकांनी वकिलांची फौज तयार करून थेट औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना मढी यात्रेत दुकानं लावण्यासाठी बंदी घालण्यात आलेल्या ठरावाला औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. उद्या कोणत्याही समाजाला वाळीत टाकण्याचे काम काही समाज कंटकाकडून होऊ शकते त्यामुळे अन्यायग्रस्तांच्या बाजूने सर्वांनी एकजुटीने उभे राहून लढावं लागेल असे आवाहन नाशिर शेख यांनी केले.शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले की तुम्ही आता कोणत्याही प्रकारचं आंदोलन करू शकत नाही अशा प्रकारचे कायदे या सरकारने होऊ घातलेले आहेत.मढीच्या प्रकरणात काकांनी लक्ष घातले म्हणून या समाजाला न्याय मिळाला.राजकारण करताना आपल्या पाठीमागे आता सक्षम व भक्कम आणि ॲक्टीव नेता असावा लागतो तो प्रताप काकांच्या रुपाने आपल्याला मिळाला आहे.सर्व सामान्यांच्या अडचणी मध्ये मी कोठेही कमी पडणार नाही काका जर लढणार असतील तर मी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे असे राजळे यांनी सांगितले.युवा कार्यकर्ते हुमायून आतार यांनी हिंदी शेरोशायरी आणि तुकोबांच्या अभंगातील ओळींचा दाखला देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.दलितांचे कैवारी वसंतराव बोर्डे यांनी मागासवर्गीय समाजातील ऊसतोडणी कामगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.अध्यक्ष पदावरून बोलताना प्रतापराव ढाकणे यांनी सांगितले की एक एप्रिलपासून संपूर्ण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करून सर्व सामान्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जोमाने प्रयत्न सुरू करणार असल्याचे सांगितले. दर सोमवारी अर्धा दिवस पंचायत समिती आणि अर्धा दिवस तहसील कार्यालयात बसून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.बबनराव बांगर यांनी सांगितले की पाडळी ते हत्राळ या एक कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम अतिशय बोगस पद्धतीने सुरू आहे.त्या कामावर डांबरीकरण करताना डांबर न वापरता नुसती खडी टाकून डागडुजी केली आहे त्याची नाशिक येथील क्वालिटी कंट्रोल विभागाकडून गुणवत्ता तपासली पाहिजे.ठेकेदाराकडे चौकशी केली असता ठेकेदार म्हणतात कोठे जायचे तिकडे जा आमच कोणी काहीच वाकडं करू शकत नाही अशी भाषा वापरणाऱ्या ठेकेदाराची या रस्त्याच्या कामाची बील अदा करण्यात येऊ नये असे बांगर यांचे म्हणणे आहे. शेवगाव तालुक्यातील आव्हाणे ते भगुर या रस्त्याच्या कामाचीही हीच अवस्था आहे त्याची ही चौकशी झाली पाहिजे.अमरापूर ते सामनगाव या रस्त्यातील खड्डे बुजवताना चक्क काही ठिकाणी काळी माती वापरली आहे.रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.रयत शिक्षण संस्थेच्या सल्लागार पदासाठी शिवशंकर राजळे यांची निवड झाली असल्याने त्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. रस्ते , विजेचा झालेला खेळ खंडोबा,पाणी, उध्वस्त झालेल्या अतिक्रमणातील टपरीधारक यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना बी ओ टी तत्वांवर जागा द्या, तसेच ताजनापूर लिफ्टचे बंधारे भरण्याचीही मागणी केली आहे.या बैठकीत अनेक प्रश्नावर चर्चा झाली. अनेकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत.या आढावा बैठकीसाठी गहिनीनाथ शिरसाठ,वजिर पठाण, योगेश रासने, सुरेशचंद्र होळकर, माधवराव काटे, रामराव चव्हाण, दिगंबर गाडे सर, सिताराम बोरूडे, विष्णू घुगे, अजित शिरसाठ, गणेश चितळकर, अविनाश फुंदे, जेष्ठ विधिज्ञ दिनकर पालवे, बंडूशेठ रासने,दिपक देशमुख, संभाजी नेहुल, सुरेश नागरे, हे आवर्जून उपस्थित होते.आभार शरद सोनवणे यांनी मानले.