मंत्रालयाचे वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन यांनी वेब पोर्टल ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांसाठी एक हक्काचे व्यासपीठ वेब मीडिया असोसिएशन मुबंई
सुरु करून राज्यभरात पत्रकारांना एक आधार दिलेला आहे.तरुण तडफदार नेतृत्व उच्च विचारसरणी उत्तम संघटन कौशल्य असलेले सामाजिक व राजकीय क्षेत्रात ओबीसी बहुजनांसाठी लढा देत काम करणारे पत्रकारीता क्षेत्रातून सामाजिक, राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे अनिलभाऊ महाजन हे आहेत.
यांचे म्हणणे आहे की क्षेत्र कुठलेही असो राजकारण असो समाजकारण असो किंवा पत्रकारिता असो प्रत्येक क्षेत्रात एकी – संघटन असणे हे गरजेचे आहे. शेवटी कुठेही संख्येला महत्त्व असते किती लोक तुमच्या सोबत आहेत याला खूप महत्त्व आहे. संघटना कुठलीही असो एकी असल्यावर त्याला बळकटी मिळते शासन प्रशासन त्यांची किंमत वाढते *वेब मीडिया असोसिएशन मुंबई ही एक देशपातळीवर चालणारी वेब मीडिया असोसिएशन आहे. पत्रकारांसाठी न्याय हक्क मिळवून देणारी संघटना आहे आणि विशेष म्हणजे अधिकृत आहे.* याचे नेतृत्व करणारे वरिष्ठ पत्रकार अनिलभाऊ महाजन एक दबंग व्यक्तिमत्व आहे. वरिष्ठ पातळीवर शासन प्रशासनात अधिकारी वर्गात मंत्रालय स्तरावर प्रशाकीय विभागात,मेट्रो सिटी मध्ये सर्व ठिकाणी अतिशय दर्जेदार पकड आनिल महाजन यांची आहे. राज्यात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांशी खूप जवळीक संबंध यांचे आहेत.
ऑनलाइन मीडियात काम करणाऱ्या व वेब पोर्टल चालावणार्या पत्रकारांना कमी लेखणाऱ्या अधिकाऱ्यांना खूप मोठा धक्का आणि चाप. वेब मीडिया असोसिएशन स्थापन करून संस्थापक अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार अनिल महाजन यांनी दिला आहे व सर्व ऑनलाईन मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांची राज्यभरात मोट बांधली आहे आणि या डिजिटल पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना वेब मीडिया असोसिएशन स्थापन करून एक सन्मान मिळवून दिला आहे व हक्काचे व्यासपीठ तयार करून दिले आहे.
आपल्या कार्यकर्त्यावर किंवा आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर मनापासून प्रेम करणारे त्यांच्या अडी अडचणींना धावून जाणारे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे अनिलभाऊ महाजन हे आहेत. पत्रकारितेच्या क्षेत्रातून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वाटचाल करणारे वेब मीडिया असोसिएशनचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. राज्यात प्रचंड जनसमुदाय जनमत यांना आहे. राज्यभरात अनेक पत्रकारांचा यांच्या वेबमिडिया असोशिएन या संघटनेमध्ये ओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे वेब मीडिया असोसिएशनचे ग्रामीण भागात ऑनलाईन मीडियासाठी करणारे पत्रकारांचे खूप मोठे संघटन वाढताना दिसत आहे.
राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात अनेक बुद्धीजीवी अनुभवी ,अभ्यासू ,पत्रकार वेब मीडिया असोसिएशन मध्ये जॉईन होत आहे. संपूर्ण राज्यभर, देशभर वेब मीडिया असोसिएशनचे जाळे पसरायला सुरुवात झाली आहे. पत्रकांरासाठी चांगली काम करणारी संघटना आणि संघटनेचे नेतृत्व करणारे व्यक्ती खंबीर असेल तर त्या संघटने सोबत लोकं जुळतातच मग ती संघटना कुठलाही क्षेत्रातली असो अशाच पद्धतीने वेब मीडिया असोसिएशन मुबंई चे काम राज्यभर सुरू आहे. आगामी काळात अनेक सामाजिक उपक्रम राज्यभर या वेब मिडिया असोसिएशनच्या वतीने राबवली जाणार आहे. अशी संघटनेच्या राज्य निरीक्षक व संचालक सदस्य अभिजित पाटील यांनी माहिती दिली आहे.