उर्दू शाळांची गुणवत्ता वाळवण्याची जबाबदारी उर्दू शिक्षकांचीच, केंद्र प्रमुख
आजच्या स्पर्धात्मक काळ मध्ये इतर माध्यमाचे शाळा सोबत स्पर्धा कायम ठेवून, शैक्षणिक कृतीच्या प्रयोग, आनंदायी शाळा व दप्तर मुक्त शनिवार,शैक्षणिक साहित्य पेटीचा वापर करून, प्रत्येक उर्दू शाळांची गुणवत्ता वाढवणे व कायम ठेवण्याची ची प्रथम जबाबदारी तिथे कार्य करणारे शिक्षकांची आहे, असे प्रतिपादन गोराडखेडा उर्दू केंद्राचे केंद्रप्रमुख शेख अब्दुल कदिर यांनी केले. ते गुरुवार रोजी मौलाना आझाद हॉल जि.प.उर्दू कन्या शाळा पाचोरा येथे संपन्न झालेले शिक्षण परिषद मध्ये बोलत होते. एक मार्च पासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सकाळ सत्र सुरू असल्याने प्रत्येक शाळांनी वेळेच्या काटेकोरपणे पालन करून शाळेची गुणवत्ता वाढवावी असे आवाहन त्यांनी केले.महाराष्ट्र शासनाकडून 100 दिवसाचे शैक्षणिक कार्यक्रम बाबत माहिती दिली. हा कार्यक्रम सुरू असताना गरज भासल्यास उन्हाळी सुट्टी मध्येही शिक्षकांनी शैक्षणिक कामकाज साठी तयार राहावे असे आव्हान त्यांनी केले.शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा (SQUAAF) बाबत रिसोर्स पर्सन इस्माईल सुलेमान व रईस सुबहान यांनी शिक्षकांचे मार्गदर्शन केले. अश्फाक शेख यांनी इयत्ता पाचवी व आठवी साठी होणारी PAT परीक्षा बाबत माहिती दिली. शिक्षक शेख जावेद रहीम यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित साहेब यांच्या हवाला देऊन प्रत्येक शिक्षकांचे प्राथमिक काम पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान साध्य करणे ही जिल्ह्यातील शिक्षण विभागाच्या प्रशासकीय यंत्रणेची आणि मुख्यतः शिक्षकांची सर्वोच्च प्राथमिकता आहे असे मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद उर्दू शाळा पाचोरा येथून शिक्षण घेऊन बिहार राज्य मध्ये शिक्षण विभागात नोकरी प्राप्त करणारे इस्राईल खान यांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन व आभार शेख जावेद रहीम यांनी केले.