नुकतेच रांगोळी प्रात्यक्षिक दिलेले शैलेश कुलकर्णी यांचे विशेष संदेश
दिनांक – ११ मार्च २०२५खानदेशातील कलेचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे खिरोदा तालुका रावेर जिल्हा जळगाव येथील सप्तपूट ललित कला भवन. येथे रांगोळी या विषयावर प्रात्यक्षिक देण्यासाठी बोलावले गेले.(खर तर हा माझा, माझ्या कलेचा मान सन्मान ,मला सार्थ अभिमान)
खर तर या कला महाविद्यालयात मी शिक्षण घेतले नाही ..किंवा विशेष काही संबंध नाही…
परंतु या महाविद्यालयाशी माझे काही भावनिक नाते आहे. माझे शालेय जीवनातील कला शिक्षक डी. आर.कोळी सर ..हे ह्याच महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेतले होते व या महाविद्यालयाची ख्याती मला त्यांच्याकडून चांगलीच ज्ञात होती. या ठिकाणाहून अनेक दिग्गज कलावंत बाहेर पडलीत.या वास्तू ने अनेक कलावंत रत्न जगासमोर आणलीत. या वास्तू मध्ये प्रवेश करताच ही दिग्गज कलावंतांची भूमी आहे , यास त्यांचं सहवास लाभला आहे असे कुठे न कुठे आपल्यालाही नक्की जाणवते.
याच वास्तूत खर तर मला प्रात्यक्षिक. साठी आमंत्रित केले गेले हे मी माझे भाग्य समजतो. कुठे न कुठे सप्तपुट मधून बाहेर पडणाऱ्या नवोदित कलाकारांसाठी मी देखील फुल न फुलाची पाकळी म्हणून योगदान देता आले …याचा मला आनंद आहे.
महाविद्यालयाचे अत्यंत मितभाषी व आपल्या मधुर वाणीने अगदी आपलेसे वाटणारे प्राचार्य अतुल मालखेडे सर , तसेच ज्यांनी मला अगदी सुरुवातीपासून ते अगदी शेवट पर्यंत हव्या असणाऱ्या मदतीची तंतोतंत पूर्तता केली व आपल्या अगदी प्रेमळ स्वभावाने आम्हास आपलेसे केले असे प्राध्यापक दिनेश पाटील सर यांचे मी विशेष आभार व्यक्त करतो. प्रात्यक्षिक पाहताना च विद्यार्थ्यांनी देखील आपापल्या परीने प्रत्यक्षिक मधून काय शिकले हे त्यांनी देखील रांगोळी रंगाशी आपली मैत्री करून जवळून न्याहाळून पहावे म्हणून त्यांनी देखील काही न काही करावे असा माझा आग्रह होता….त्यास प्राचार्य अतुल मालखेडे सर तसेच प्राध्यापक दिनेश पाटील सर यांनी अनुमोदन दिले… व विद्यार्थ्यांनी देखील अगदी उत्साहाने सहभाग घेऊन पहिल्याच प्रयत्नात अतिशय सुंदर अशा रांगोळी कलाकृती रेखाटल्या…त्या विद्यार्थ्यांचे ही अभिनंदन…भविष्यात या कार्यशाळेमध्ये नक्कीच काही नवोदित रांगोळी कलाकार यातून पुढे येथील अशी मला खात्री आहे .
यात मला अतिशय साथ देणारे माझे मित्र अमन कुमार शाह (बिहार) तसेच माझा प्रिय विद्यार्थी प्रणव कोळी यांचेही खूप खूप आभार.
पुनश्च सप्तपुट ललित कला भवन परिवाराचे मनःपूर्वक धन्यवाद देतो, तसेच या परिवाराशी असलेले माझे भावनिक नाते यापुढेही नक्की राहील अशी मी आशा व्यक्त करतो.
रांगोळी कलाकार – कलाशिक्षक शैलेश लक्ष्मीकांत कुलकर्णी
पाचोरा जिल्हा जळगाव.
संपर्क – 8446932849
(Insta I’d – kalachhand art)