पाचोरा वकील संघातर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
पाचोरा प्रतिनिधी/ येथील न्यायालयात महिला दिनानिमित्त न्यायालयात कार्यरत असलेल्या महिला वकील भगिनी व न्यायालयीन कर्मचारी भगिनी यांचा पाचोरा वकील संघातर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष ॲड.प्रवीण पाटील यांनी केले. अध्यक्षस्थानी पाचोरा न्यायालयाच्या सहायक न्यायाधीश दिवाणी व फौजदारी. सो. बोरा मॅडम या होत्या. मुख्य न्यायाधीश औंधकर. सहाय्यक न्यायाधीश निमसे. पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रवीण पाटील, उपाध्यक्ष ॲड. कविता मासरे(रायसाकडा), सचिव ॲड. निलेश सूर्यवंशी., सहसचिव ॲड. अंबादास गिरी, सरकारी वकील. ॲड. हटकर मॅडम, सरकारी वकील ॲड. येवले साहेब सौ मीना सोनवणे सरकारी अभिवक्त. हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड शर्मा, ॲड अनिल पाटील, ॲड चंचल पाटील, सरकारी वकील येवले, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती बोरा मॅडम तसेच पाचोरा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश औंधकर यांनी मार्गदर्शन केले.कायक्रमावेळी पाचोरा न्यायालयाचे सर्व वकील बांधव यांची उपस्थिती लाभली.
यावेळी सुत्रसंचलन ॲड अंबादास गिरी यांनी तर आभार ॲड कविता मासरे (रायसाकडा) यांनी मानले.