पुणे बसस्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात शिवसेना महिला आघाडी तर्फे घेण्यात आला बसस्थानकाच्या सुरक्षाचा आढावा

पुणे बसस्थानकात महिलेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात शिवसेना महिला आघाडी तर्फे घेण्यात आला बसस्थानकाच्या सुरक्षाचा आढावा

 

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचाराची दुर्दैवी घटना नुकतीच दोन तीन दिवसांपूर्वी घडली. त्याच अनुषंगाने तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा.ना. श्री . प्रतापजी सरनाईक साहेबांच्या आदेशानुसार शिवसेना महिला आघाडी पाचोरा यांच्या वतीने परिवहन मंडळाच्या आगारांमध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांचा आढावा घेण्यात आला. असून पाचोरा महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी यांनी पाचोरा बस स्थानकाची पाहणी केली. १) महिला प्रवाशांकरिता स्वच्छ व सुरक्षित स्वच्छतागृह

 

२) स्तनादामातांकरिता हिरकणी कक्ष असल्यास संख्या व स्थिती

 

३) विकलांग प्रवाशांसाठी सहज सुलभ प्रवेश व प्रतीक्षा/विश्रामाची जागा

 

४) महिला अधिकरी/कर्मचाऱ्यांकरिता स्वच्छ व सुरक्षित विश्रामाची जागा.

 

६) स्वच्छ पिण्याचे पाणी व नीटनेटके खाणपान ग्रह

 

 

आशा अनेक समस्यांची पाहणी केली असून ज्याही गैरसोयी निर्दशास आल्या ते लक्षात आणून दिले. या प्रसंगी उपस्थित शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी महिला भगिनीं सौ .मंदाकिनी निलेश पारोचे,

(शहर प्रमुख शिवसेना महिला आघाडी),सौ मंदाकिनी निळकंठ पाटील (तालुकाप्रमुख शिवसेना महिला आघाडी), सौ सुषमा मनोहर पाटील (तालुका संघटक महिला आघाडी), सौ सुनंदा मधुकर महाजन (उपतालुकाप्रमुख महिला आघाडी), सौ प्रीती विनोद सोनवणे (उपशहर प्रमुख महिला आघाडी),सौ अनुसया ताई राठोड

(शिवसेना महिला आघाडी) उपस्थित होत्या.