मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे नाशिक जिल्हा परिषदेच्या सीओंना हिसवळ बु: जिल्हा परिषदेच्या शेतकी शाळेतील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश

मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे नाशिक जिल्हा परिषदेच्या सीओंना हिसवळ बु: जिल्हा परिषदेच्या शेतकी शाळेतील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नाशिक येथील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे जिल्हा परिषदेच्या सीओंना नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पाच एकर क्षेत्रातील जमिनीवरील अतिक्रमणे तात्काळ हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती अशी की नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिसवळ बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सन 1956 साली नाशिक जिल्हाधिकारी साहेब यांच्या वटहुकूम जावक नं qif/ws/२२००/दिनांक 30जुन 1956 अन्वये आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या लोकल बोर्डाचे अध्यक्ष यांच्या कार्यालयीन आदेशानुसार हिसवळ बुद्रुक येथील गट नंबर 137 मध्ये पाच एकर जमीन ही शेतकी शाळेला देण्यात आली होती. परंतु सदर शाळेच्या जागेवर सन 2001-2020 या सालातील कालावधीत सरपंचाच्या मनमानी कारभारामुळे अनेक प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत.या संदर्भात हिसवळ बुद्रुक येथील रहिवासी आर टी आय चे कार्यकर्ते लक्ष्मण निव्रुती बोगीर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सह संबंधित विभागांना दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजीच्या पत्रकान्वये अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली होती.या मागणीला मुख्यमंत्री सचिवालय कक्षाकडून हिरवा कंदील मिळाला असून हीसवळ जिल्हा परिषद शाळेतील शेतकी शाळेची जमीन अतिक्रमण मुक्त करावी असे लेखी आदेश दिनांक 18/2/2025 रोजी देण्यात आले आहेत.या अगोदरही दि.12 ते 14ऑक्टोबर 2020 या कोरोनाच्या कालावधीत लक्ष्मण बोगीर यांनी उपोषण केले होते.तेव्हा तत्कालीन सरपंचांनी अतिक्रमण निष्कासित करण्याचे लेखी आश्वासन दिले होते.परंतु तत्कालीन सदर सरपंचांनी आश्वासनाची पुर्तता केली नाही.असा आरोप बोगीर यांनी केला आहे.पण आता नाशिक निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ तथा पदसिद्ध विशेष कार्य अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष नाशिक यांच्या लेखी आदेशाची अंमलबजावणी केली जाते की सदर आदेशाला केराची टोपली दाखवली जाते हे आगामी काळात दिसणार आहे.संपूर्ण महाराष्ट्रात अतिक्रमणे हटाव मोहिम सुरू झाली असल्याने या आदेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.