श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

श्री. गो. से. हायस्कूल पाचोरा येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा

 

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री.गो. से. हायस्कूल पाचोरा येथे दिनांक 28/02/2025 शुक्रवार रोजी भारताचे भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही.रमन यांना नोबल पुरस्कार मिळाल्याबद्दल साजरा करण्यात येणारा *‘राष्ट्रीय विज्ञान दिवस‘* उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री.एन.आर पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री.आर. एल.पाटील सर, प्रयोगशाळा सहाय्यक सौ.एस.एस. सोनवणे मॅडम, श्री.आर.बी. बांठीया सर, श्री.डी.डी. विसपुते सर, श्री अनिल पाटील सर, श्री.पी.पी. नैनाव सर, श्री शुभम पाटील सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी विज्ञान शिक्षक श्री.आर.बी. बांठीया सर यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन कशा प्रकारे निर्माण करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देखील विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आपले जीवन जगणे कसे सोपे झाले आहे याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.पी.पी. नैनाव सर प्रास्ताविक श्री.डी.डी. विसपुते सर व आभारप्रदर्शन श्री अनिल पाटील सर यांनी केले.