एक लाख रुपये ईनाम लावलेला स्वारगेटच्या बसमधील संशयित बलात्कारी आरोपी दत्तात्रय गाडे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन टाकणाऱ्या पुण्यातील स्वारगेट बस मध्ये प्रवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे वय (वर्षे 37) राहणार गुणाट,तालुका शिरूर तालुका जिल्हा पुणे यांच्या त्याच्याच गुनाट गावात जाऊन पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर बलात्कार केल्या नंतर गाडे हा फरार होउन आपल्या शिरूर तालुक्यातील गुनाट गावात महाशिवरात्री निमित्त होत असलेल्या किर्तन महोत्सवात सहभागी झाला होता. परंतु सोशल मिडीयावर त्याच्या विरोधात एक लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाल्यामुळे तो सर्वत्र वाँटेड होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या एकुण तेरा फौजा तैनात करण्यात आल्या होत्या.गावात त्याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने एका उसाच्या शेताचा आश्रय घेऊन तेथे तो लपून बसला होता.पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेने त्याला ड्रोनच्या सहाय्याने वेढा घालून चोहोबाजूंनी घेरले होते.मोबाईल लोकेशन वरून पोलिस त्याच्या पर्यंत पोहोचले होते.शुक्रवारी रात्री पोलिसांनी अथक परिश्रम करून रात्री दिड वाजण्याच्या दरम्यान गाडे याच्या मुसक्या आवळल्या आहेत.पोलिस तातडीने त्याला पुण्यातील न्यायालयात हजर करणार आहेत. स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 59/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 64,351(2) प्रमाणे संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मग पोलिसांनी गाडे यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीसाठी एक लाख रुपयांचे इनाम जाहीर केले होते.स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, आणि महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती पुनम पाटील यांच्याशी संपर्क साधून या आरोपींची माहिती कळवावी असे आवाहन करण्यात आले होते. माहिती देणाऱ्या व्यक्तीचं नाव सुद्धा गुप्त ठेवले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण पोलिसांच्या या कामगीरी मुळे आता प्रवाशांच्या सेवेसाठी असलेल्या स्वारगेट बसस्थानकात सर्वच ठिकाणी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाडे याला लष्करी पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.नंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.न्यायालयात आरोपीला किती दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात येते या कडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. अत्याचार ग्रस्त तरुणीने पोलिसात केलेल्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी ही चोख कारवाईची कामगिरी केली आहे.