जवखेडे येथे ह.भ.प. निव्रुती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने महाशिवरात्री किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता

जवखेडे येथे ह.भ.प. निव्रुती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने महाशिवरात्री किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) महाशिवरात्री निमित्त जवखेडे खालसा येथील महादेव मंदिरात ह.भ.प. निव्रुती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या गौरवशाली महाशिवरात्री किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता झाली.मतकर महाराज यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.या किर्तन महोत्सव सोहळ्यात ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड,ह.भ.प. ज्ञानेश्वर माउली कराळे,ह.भ.प. अभिमन्यू महाराज भालसिंग,आणि शेवटी ह.भ.प. निव्रुती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या गौरवशाली महाशिवरात्री किर्तन महोत्सव सोहळ्याची सांगता झाली.त्यांनी जगात अध्यात्म हेच खरे आहे बाकीच्या गोष्टी व्यर्थ आहेत असे सांगितले.ह.भ.प. प्रल्हाद महाराज आंधळे, महादेव सरगड, आदिनाथ वाघ,शरद गवळी, कानिफनाथ विद्यालय कर्मचारी वृंद,नामदेव सरगड, यांनी अन्नदान केले.या सोहळ्यासाठी ह.भ.प.बाबासाहेब महाराज मतकर यांच्या वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थी,ह.भ.प. आबाजी आंधळे, विष्णुपंत घाटुळ, ज्ञानदेव मतकर, दगडूशेठ आंधळे, मल्हारी परभणे,जेउर हैबतीचे शिवाजी वाघ,चोपदार हिराजी मतकर,संभाजी भोसले, यांनी विशेष सहकार्य केले.व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच चारूदत वाघ, जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, माजी सरपंच शिवाजीराव मतकर, सोसायटीचे सचिव भाऊराव कासार, संचालक बाबासाहेब सरगड, हरीभाऊ जाधव,गोरक्ष चितळे मेजर,जगन्नाथ पाचेसर,राजेंद्र मतकर सर, विठ्ठल मतकर, हनुमान चितळे सर, विक्रम नेहुल सर, नामदेव मतकर,उत्तम आंधळे,राधाकिसन जाधव,पोपट वाघ, कैलास धनवडे,मच्छिंद्र सरगड,महादेव सरगड यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडहोकेट वैभवराव आंधळे यांनी केले.तर अण्णा तळेकर यांनी आभार मानले.यावेळी सर्वासमक्ष व्रुद्धेश्वर मंदिरातील दानपेटी खोलण्यात आली.महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.