आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी विषयावर
शुक्रवारी ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन

जळगाव, दि. 28 – राज्यातील युवक-युवतींसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयामार्फत शुक्रवार, 30 जुलै, 2021 रोजी दुपारी 3 ते 5 या वेळेत कौशल्यातून रोजगाराकडे (आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी) या विषयावर ऑनलाईन मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या मार्गदर्शन शिबिरात श्री. नितीन जाधव, कौशल्य अभियान अधिकारी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, दुपारी 3.00 ते 3.25 या वेळेत, श्री. श्रीपाद दिगंबर आमले, फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, आस्थापना ट्रेनिंग अँड कन्सल्टन्सी, ओ.पी.सी. प्रा. लि. पुणे हे दुपारी 3.25 ते 3.50 या वेळेत, डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती हे दुपारी ३.५० ते ४.१५ या वेळेत तर डॉ. विठ्ठल लहाने, सुप्रसिध्द प्लास्टिक सर्जन, लातूर दुपारी ४.१५ ते ४.४० या वेळेत आरोग्य व आरोग्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार असून दुपारी 4.40 ते 5.00 वाजेपर्यंत पश्नोत्तरे घेण्यात येणार आहे.
या मागदर्शन सत्रात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक व युवतींनी खालील लिंकव्दारे सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने केले आहे.
फेसबुक – https://www.facebook.com/MaharashtraSDEED
युट्युब – https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A