महाशिवरात्री निमित्त जवखेडे खालसा येथील महादेव मंदिरात तिनं दिवस किर्तन महोत्सव

महाशिवरात्री निमित्त जवखेडे खालसा येथील महादेव मंदिरात तिनं दिवस किर्तन महोत्सव

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) अ.नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आळंदी निवासी ह.भ.प.निव्रुत्ती महाराज मतकर यांच्या नियोजनाखाली जवखेडे खालसा येथील महादेव मंदिरात तिनं दिवस किर्तन महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २५ते२७ फेब्रुवारी या कालावधीत हा सोहळा साजरा होणार आहे.मंगळवारी रात्री ह.भ.प. लक्ष्मण महाराज कराड यांचे किर्तन होईल.बुधवारी सकाळी गंगाजल कावडी मिरवणूक आणि महादेव मंदिरात महाअभिषेक होउन लगेच ज्ञानेश्वर माउली कराळे (करंजी घाट)यांचे किर्तन होईल.रात्री वाघोलीच्या यादव बाबा संस्थानचे पदाधिकारी ह.भ.प.अभिमंन्यु महाराज भालसिंग यांचे किर्तन होईल.गुरुवारी सकाळी ग्रंथ दिंडी मिरवणूकीनंतर ह.भ.प. निव्रुती महाराज मतकर यांच्या काल्याच्या किर्तनाने आणि गावचे जेष्ठ भाविक नामदेव मारुती सरगड यांच्या महाप्रसादाच्या पंगतीने या सोहळ्याची सांगता होणार आहे.तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या सोहळ्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन जवखेडे खालसा येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चारुदत्त वाघ मित्र मंडळ आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.