60 वी पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी जिल्हा खो खो निवड चाचणी स्पर्धा

60 वी पुरुष/महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेसाठी जिल्हा खो खो निवड चाचणी स्पर्धा….!!!!!

 

जळगांव – महाराष्ट्र खो खो असोसिएशनने 2024-25 या वर्षाची पुरुष व महिला विभागाची 60 वी राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धा अहिल्यानगर (अहमदनगर) येथे आयोजित केली आहे. त्यासाठी जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन तर्फे सन 2024-25 ची पुरुष/महिला गटाची निवड चाचणी व स्पर्धा रविवार दिनांक 2 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता जळगांव जिल्हा क्रीडा संघ मैदानावर घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी भाग घ्यावा असे आवाहन संघटनेचे पदाधिकारी आमदार चंद्रकांत सोनवणे,प्रा.डी. डी. बच्छाव,शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त श्री गणपतराव पोळ,उदय पाटील,प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर,सुनिल समदाणे,जयांशू पोळ,सौ.विद्या कलंत्री यांनी केले आहे.

 

 

अधिक माहितीसाठी संपर्क

 

1) राहुल पोळ – 9404292714

2) दत्तात्रय महाजन – 7020751823

3) विशाल पाटील – 9970308326

4) दिलीप चौधरी – 9158469294