श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे विधी सेवा शिबीर उत्साहात संपन्न
जळगाव -पाचोरा तालुका विधी सेवा समितिच्या समांतर विधी सहाय्यक प्रा. डॉ.सुनिता गुंजाळ व सौ ललिता पाटील, मुकेश
नेनावं यांनी तालुका विधी सेवा समिती पाचोरा व वकील संघ पाचोरा यांच्या संयुक्त विद्यमानाने विधी सेवा समितीचे शिबीर श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा येथे घेण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.आर.ठाकरे सर हे होते समांतर विधी सहाय्यक प्रा. डॉ.सुनिता गुंजाळ यांनी माहितीचा अधिकार तसेच पोकसो कायदा यासंदर्भात विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली समांतर विधी सहायक सौ. ललिता पाटील यांनी मूलभूत हक्क व कायदे यासंदर्भात मार्गदर्शन केले. तसेच समांतर विधी सहायक डॉ. मुकेश नैनाव यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण संदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाप्रसंगी पाचोरा वकील संघाचे सचिव ॲड.निलेश सूर्यवंशी उपाध्यक्षा ॲड.कविता रायसाखडा ॲड.चंचल पाटील, विद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव ॲड. निलेश सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन बोरसे सरांनी केले, तर आभार संदीप मनोरे यांनी मानले.