पाचोऱ्यात गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये रंगला क्रीडा सप्ताह

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये रंगला क्रीडा सप्ताह

 

 

शिव जयंती चे औचित्य साधून आज पाचोरा येथील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये सुरू असलेल्या क्रीडा सप्ताहाचे अंतिम सामने ठेवत स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करत शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी, मा. नगरसेवक श्री बापू भाऊ हटकर व समाजसेवक श्री हरी भाऊ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व भाला फेक करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा सप्ताह महोत्सवात नर्सरी पासून ते ९ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी व्हॉलिबॉल, कब्बडी, खोखो , रनिग, सैकरेस सारख्या आउट डोअर गेम्स मध्ये भाग घेतला तर काहीनी चेस, कॅरम, टेबल टेनिस, रायफल शूटिंग, बकेट बॉल, बॅडमिंटन सारख्या अनेक इनडोअर गेम्स मध्ये सहभाग नोंदविला. तसेच अंतिम सामने पाहण्यासाठी पालकांनाही आमंत्रित करण्यात आले व पालकांनी संगीत खुर्ची स्पर्धेत भाग घेऊन खेळाचा आनंद लुटला. विजयी पालकांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
* तसेच, आज २० फेब्रुवारी रोजी विजयी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे प्राचार्य श्री प्रेम शामनाणी सर यांनी स्वीकारले. सूत्र संचालन सौ. क्षितिजा हटकर व सौ. अमेना बोहरा मैडम यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्विते साठी क्रीडा शिक्षक श्री नीलेश कुलकर्णी सर व साक्षी पवार मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.