ॲड कविता मासरे (रायसाकडा) यांची नोटरीपदी नियुक्ती
(पाचोरा प्रतिनिधी)
येथील प्रख्यात विधी तज्ञ एडवोकेट कविता मासरे (रायसाकडा) यांची भारत सरकारच्या वतीने नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्याबद्दल सर्व स्तरातून ॲडवोकेट कविता मासरे (रायसाकडा) यांच्यावर अभिनंदन वर्षाव होत आहे
केंद्र सरकारच्या विधी व न्याय विभागातर्फे पदी निवड करण्यात आलेल्या यादीमध्ये ऍडव्होकेट कविता मासरे (रायसाकडा) यांचा नावाचा समावेश आहे यांना मागील 14 वर्षापासून वकिली व्यवसायाचा अनुभव आहे तसेच ते सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या या निवडीबद्दल सहकारी मित्र परिवार यांच्यासह विविध संस्थेची तसेच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे पाचोरा येथील दिवाणी व फौजदारी तसेच जिल्हा सत्र न्यायालयात येथे कार्यरत आहेत कायदेशीर दस्तावेज स्वाक्षरी करण्यासाठी अधिकृत व्यक्ती म्हणून नोटरी हे फार महत्त्वाचे आहे व्यवहार योग्य रीतीने पार पाडले जातील याची खात्री करण्यासाठी आणि फसवणूक रोखण्यासाठी कायदेशीर कागदपत्रे नोटरी केली जातात भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी प्रमाणपत्र देऊन नोटरी पदी निवड केली आहे. नियुक्तीचे रीतसर प्रमाणपत्र त्यांना प्राप्त झाले आहे एडवोकेट कविता मासरे (रायसाकडा) यांची नोटरी पदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल पाचोरा भडगाव तालुक्यातील जनतेतून सहर्ष स्वागत होत आहे. ॲड कविता मासरे (रायसाकडा) हे पाचोरा वकील संघाच्या उपाध्यक्षपदी हि विराजमान आहेत सर्वांना समान न्याय देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात सर्व स्तरावर ॲड कविता मासरे (रायसाकडा) यांना अभिनंदन पर शुभेच्छा देण्यात येत आहे