जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कौसाबाई जाधव यांची बिनविरोध निवड

जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कौसाबाई जाधव यांची बिनविरोध निवड

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”/ अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी) पाथर्डी तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या आणि व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणाऱ्या जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी कौसाबाई केरु जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.माजी उपसरपंच वर्षाताई गवळी यांनी दीड महिन्यापूर्वी आपल्या उपसरपंच पदाचा राजिनामा दिला होता. नवीन उपसरपंच पदासाठी गोविंद मतकर आणि वैभव आंधळे यांच्यातच खरी रस्सीखेच सुरू होती. परंतु कौसाबाई केरु जाधव यांनी बाजी मारत उपसरपंच पद हस्तगत केले.मागासवर्गीय मतदारांच्या मतांचा आदर करुन त्यांच्या मतांची उतराई होण्यासाठी कौसाबाई केरु जाधव यांना या पदावर विराजमान करण्यात आले आहे. लोकनियुक्त सरपंच चारूदत वाघ यांनी मागासवर्गीय समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही खेळी केली आहे. विरोधी पक्षांकडून उपसरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात न आल्याने ही बिनविरोध निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. विरोधी गटाचे सर्व सदस्य गैरहजर राहिल्याने ही निवडणूक सत्ताधारी गटाला सोपी झाली होती. लोकनियुक्त सरपंच चारूदत वाघ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आंधळे &मतकर यांच्या रस्सीखेचीवर नामी उपाय शोधून काढून श्रीमती कौसाबाई जाधव यांच्या गळ्यात उपसरपंच पदाची माळ टाकण्यात आली.निवडनुक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नितीन बटुळे यांनी काम पाहिले.यावेळी सौ.सुनिताताई वाघ, जवखेडे खालसा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे संचालक बाबासाहेब मतकर, हरीभाऊ जाधव साहेब,मुक्तारभाई शेख, विठ्ठलराव लांघे,राजेश भोसले,साहिल शेख, विठ्ठल काळे, सुदर्शन सरगड,शामराव भोसले, संजय जाधव, किशोर भोसले,भागचंद लांघे, ऋषिकेश आंधळे, बाळासाहेब जाधव, संजय जाधव,अन्सार शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते.आभार नितीन जाधव यांनी मानले.