श्री.गो.से.हायस्कूल ची शैक्षणिक सहल रवाना

श्री.गो.से.हायस्कूल ची शैक्षणिक सहल रवाना

 

 

आज दि. 12/2/2025 बुधवार रोजी पा.ता.सह.शिक्षण संचलित श्री.गो.से.हायस्कूल.पाचोरा ची एक दिवसीय शैक्षणिक सहल सकाळी 6 वाजता रवाना झाली.

सहलीमध्ये कालीमठ,वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग दर्शन, दौलताबाद किल्ला व औरंगाबाद येथील बीबी का मकबरा व सिद्धार्थ गार्डन अशा विविध प्रेक्षणीय स्थळांना विद्यार्थी सहलीच्या माध्यमातून भेट देणार आहे.

सहलीसाठी दोन्ही बस मार्गक्रमण करण्याअगोदर श्रीफळ वाढवून निरोप देण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील., उपमुख्याध्यापक श्री.आर.एल.पाटील., पर्यवेक्षक श्री ए. बी.अहिरे. तसेच शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गउपस्थित होते.