‘विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास, नेतृत्वगुण व सर्जनशीलतेचा विकास व्हायला हवा’-अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.एस.राजपूत
चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील महाविद्यालय, चोपडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण मंत्रालय, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत ‘एक दिवसीय विद्यार्थी कौशल्य विकास कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून तसेच माजी शिक्षणमंत्री कै. मा. ना. अक्कासो. सौ. शरच्चंद्रिका सुरेश पाटील व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.मा. दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. सूर्यवंशी तसेच कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.एस.राजपूत व कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अधिसभा सदस्य प्रा.डॉ.गजानन पांडुरंग पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थी कौशल्य विकास कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.आर.एम. बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन. सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ आदि उपस्थित होते. या कार्यशाळेप्रसंगी विद्यापीठ परिक्षेत्रातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातून एकूण १५० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ.आर.एम.बागुल यांनी कार्यशाळा आयोजनामागील उद्देश व भूमिका स्पष्ट केली.
याप्रसंगी उदघाटनपर मनोगत व्यक्त करताना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.एस.एस.राजपूत म्हणाले की, तरुणांना रोजगारक्षम शिक्षण देऊन त्यांच्यातील आत्मविश्वास निर्माण करणे व नेतृत्व विकास करणे व सर्जनशीलतेचा विकसित करणे हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास या कार्यशाळेद्वारे साध्य झाला पाहिजे म्हणून सर्वसमावेशक शिक्षणावर भर दिला पाहिजे’.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कार्यात प्रामाणिकपणा व नीतिमत्ता टिकवून ठेवायला हवी, असे आवाहन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की,’विद्यार्थ्यांनी वेळेचे अचूक नियोजन, नितीमूल्यांची, प्रामाणिकपणा, नैतिकता, व्यवस्थापन, अचूक नियोजन या गोष्टींचा अवलंब जीवनात केला तरच सर्वांगीण विकास होईल. रोजगार निर्मितीक्षम शैक्षणिक वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. गतकाळातील ज्ञान, विज्ञान, मूल्य यांचा परिचय विद्यार्थ्यांनी करून घ्यायला हवा’.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता पाटील यांनी केले तर आभार प्रा. मयूर बी. पाटील यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समिती प्रमुख व सदस्य यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.