कासार पिंपळगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहात तुकाराम गाथा पारायणात सोहळ्याचे आयोजन
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे स्व.दादापाटील राजळे यांनी सुरू केलेला आणि केशव महाराज गुजर आव्हाणेकर यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 4 ते 11 फेब्रुवारी 2025 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहात तुकाराम गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात दररोज सकाळी काकडा भजन, विष्णू सहस्त्रनाम, गाथा भजन दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, आणि रात्री 8 ते 10 हरि किर्तन या प्रमाणे कार्यक्रमाची रुपरेषा ठरवन्यात आली आहे. सर्व ह.भ.प.क्रुष्णा ताठे, बाबासाहेब मतकर, हरिश्चंद्र दगडखैर, मच्छिंद्र चितळे, कल्याण शिंदे, अर्जुन चितळे, बबन भिसे यांची प्रवचने तर सर्व ह.भ.प.बाळासाहेब रंजाळे, हरिदास पालवे, निलेश वाणी, रामगिरी येळीकर, हनुमान डांभे, अक्षय उगले, सोपानकाका वाल्हेकर यांची किर्तने होणार आहेत.सोमवार दिनांक 10/2/2025 रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत तुकाराम गाथा मिरवणूक आणि रात्री दिप प्रज्वलन होणार आहे. मंगळवार दिनांक 11/2/2025 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होउन 222 शेवगाव – पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत हॅट्ट्रिक साधत विजय मिळवला म्हणून आमदार मोनिकाताई राजळे यांची पेढेतुला होउन कासार पिंपळगाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे पारायण नेतृत्व ह.भ.प. दत्तात्रय महाराज राजळे हे करीत आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या या पारायण सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि भजनी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. याचवेळी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने ही आमदार मोनिकाताई राजळे यांचा सत्कार करण्यात येणार आहे.