गुणवत्ता यादीत पाचोऱ्याच्या रंगश्री ची विद्यार्थिनी कु. तनुश्री सोमपूरकर,सोबतच 49 विद्यार्थी A ग्रेड मध्ये
महाराष्ट्र शासनाच्या कलासंचालनालयातर्फे दरवर्षी ही परीक्षा घेतली जाते.शासनाची रेखा कला परीक्षा इंटरमिजिएट 2024 चा निकाल नुकताच लागलेलाआहे. महाराष्ट्र,गोवा,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातून लाखोच्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.. इ 10 वी परीक्षेत या ग्रेड परीक्षेचे अतिरिक्त गुण मिळतात
चित्रकलेच्या या परीक्षेत इतर सरकारी परीक्षेप्रमाणे मेरिट लिस्ट ही जाहीर होत असते. यात संपूर्ण विषयाची एक व प्रत्येक विषयाची 4 लिस्ट जाहीर होत असतात.
या गुणवत्ता यादीत रंगश्री ची कु तनुश्री राहुल सोमपूरकर* ही *22 वी* आली आहे.*डिझाईन* या विषयात महाराष्ट्रात टॉप 10 विद्यार्थ्यांमध्ये ती *पहिली* आली. तिला 100 पैकी 100 गुण मिळाले आहे.
सोबतच *geomentry* या विषयातही ती 10 टॉपर विद्यार्थ्यांमध्ये *9 वी* आली तिला त्या विषयात 92 मार्क्स मिळाले.लोहटार येथील मूळ रहिवासी प्रगतीशील शेतकरी राहुल सोमपूरकर पाचोरा रहिवासी यांची ती सुकन्या.
गुणवत्ता यादीत येण्याची रंगश्रीची ही पहिलीच वेळ आहे
सोबतच विद्यार्थ्यांनी मागील वर्षाचे A ग्रेड चे रेकॉर्ड मोडत या वर्षी 49 विद्यार्थी A ग्रेड ने उत्तीर्ण होऊन उच्चांक गाठला. एकूण 49विद्यार्थी A ग्रेड मध्ये आलेले आहे. रंगश्री चा निकाल 100टक्के लागलाअसून या विद्यार्थ्यांना सुबोध कांतायन सर, सौ भारती कांतायन मॅडम यांच्या मार्गदर्शनाची साथ लाभली.
मेरिट लिस्ट व जास्तीतजास्त A ग्रेड ला विद्यार्थी आल्यामुले सर्वांचे पाचोर्यात कौतुक होत आहे.