जवखेडे येथे हनुमान मंदिर प्रथम वर्धापन दिनानिमित्त ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याची सांगता
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर जिल्हा) अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे हनुमान, गणपती, शनिदेव महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दि.२७ते ३१जानेवारी या काळात करण्यात आले होते.ह.भ.प.श्रीरंग स्वामी महाराज तळेकर, आणि व्रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ह.भ.प.बाबासाहेब महाराज, मतकर,ह.भ.प. क्रुष्णानंदजी महाराज, ह.भ.प. शंकर महाराज भागवत, ह.भ.प. म्हातारदेव महाराज आठरे,यांची किर्तने झाली.दिंडी मिरवणुकी नंतर ह.भ.प.सुदर्शन महाराज कारखेले यांच्या काल्याच्या किर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली.या काळात ह.भ.प.ज्ञानदेव मतकर, अरुण वाघ, रामचंद्र वाघ, गोविंद घाटुळ, विठ्ठल मतकर, अर्जुन देशमुख, भानुदास शिंदे, गोविंद मतकर, मच्छिंद्र सरगड,राजेश मतकर, प्रल्हाद आंधळे, दत्तात्रय वाघ, राजेंद्र मतकर सर यांनी अन्नदान केले. संभाजी वामन आंधळे मेजर, आणि हनुमान नाना चितळे सर यांच्या काल्याच्या महा प्रसादाच्या पंगतीने या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली. या सोहळ्यासाठी जेष्ठ नेते पोपटराव आंधळे, सरपंच चारूदत वाघ, ॲडव्होकेट वैभवराव आंधळे, अमोल वाघ, विष्णूपंत घाटुळ, अण्णा साहेब तळेकर, उत्तमराव आंधळे, शिवाजी मतकर,कारखेले सर, आबाजी आंधळे, बाबासाहेब सरगड, सोसायटीचे सचिव भाऊराव कासार, आदिनाथ मतकर, ज्ञानदेव ढाकणे, विठ्ठल मतकर, अमोल तळेकर,रामा आव्हाड, शिवनाथ घाटूळ, बाळासाहेब जाधव हे आवर्जून उपस्थित होते. (साईनाथ कासार, म्रुदुंगाचार्य),(हिराजी मतकर, चोपदार), (दगडूशेठ आंधळे यांनी हार्मोनियम),(मंडप व्यवस्था संभाजी भोसले), (सुदर्शन भोसले, गायनाचार्य) व पाणी पुरवठा ऋषिकेश आंधळे यांनी केली.गावचे जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ह.भ.प.सुदर्शन महाराज कारखेले यांनी उपस्थित श्रोत्यांना विविध प्रकारचे रामायण महाभारतातील दाखले देऊन मंत्रमुग्ध केले . महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली.पंचक्रोषीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.