चोपडा महाविद्यालयात रंगले खान्देशी कवी व संशोधक यांचे सुसंवाद सत्र

चोपडा महाविद्यालयात रंगले खान्देशी कवी व संशोधक यांचे सुसंवाद सत्र

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा मराठी अभ्यास मंडळ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दि.२९ जानेवारी, २०२५ रोजी प्रथम वर्ष कला मराठी या विषयाच्या द्वितीय सत्रावर आधारित ‘विद्यापीठस्तरीय चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू प्रा.डॉ.एन.के.ठाकरे यांच्या हस्ते खान्देश कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या चर्चासत्रात ६० हून अधिक संशोधक प्राध्यापक बंधू-भगिनी तसेच खान्देशातील १५ मान्यवर कवी उपस्थित होते.

सदर चर्चासत्र उदघाटन सत्र, कवी व संशोधक संवाद सत्र वआणि समारोप सत्र अशा तीन सत्रात पार पडले. चर्चासत्राच्या द्वितीय सत्राच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध खान्देश कवी अशोक सोनवणे हे उपस्थित होते. यावेळी कवी वा. ना. आंधळे, कवी मिलिंद बागुल, कवयित्री लतिका चौधरी, कवयित्री विमल वाणी, कवी प्रभाकर शेळके, कवी प्रभाकर महाजन, कवी निंबा बडगुजर, कवी संतोष पावरा, कवी राजेंद्र रायसिंग, कवी संतोष साळवे या कवींनी आपल्या काव्यनिर्मिती मागील भूमिका, लेखन प्रेरणा स्पष्ट करून कवितांचे सादरीकरण केले तसेच उपस्थित संशोधकांशी सुसंवाद साधला.या सत्राचे सूत्रसंचालन डॉ. माणिक बागले यांनी केले तर आभार डॉ.एम.एल.भुसारे यांनी मानले.

या चर्चासत्राच्या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. फुला बागुल हे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य चर्चासत्र संयोजक व उपप्राचार्य प्रा.डॉ.के.एन.सोनवणे, उपप्राचार्य डॉ.ए.बी. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, प्रा.डॉ. फुला बागुल, अभ्यास मंडळ सदस्य डॉ. माणिक बागले, डॉ. संदीप माळी, डॉ. सचिन पाटील व डॉ. सुलतान पवार आदि मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाप्रसंगी डॉ.शरद बिऱ्हाडे व डॉ. जतीनकुमार मेढे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त करतांना एकंदरीत चर्चासत्रातील उल्लेखनीय बाबींवर प्रकाश टाकून चर्चासत्राच्या आयोजन व नियोजनाचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना प्रा. डॉ. फुला बागूल यांनी चर्चासत्रातील दिवसभरात झालेल्या विचार मंथनातून विद्यार्थ्यांना कवितेविषयी अध्यापन करतांना या चर्चासत्राचा निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.त्याबरोबर काव्यप्रयोजन, भूमिका, काव्याची सौंदर्य स्थळे यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.

या समारोप सत्राचे सूत्रसंचालन व आभार चर्चासत्र समन्वयक डॉ. एम.एल.भुसारे यांनी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. एम. टी.शिंदे, सौ. सुनीता पाटील, डॉ.आर.आर.पाटील, डॉ.एम.बी.पाटील, डॉ.सौ. संगीता पाटील, डॉ. ए.एच.साळुंखे, एन. बी. पाटील, सौ. पुष्पा दाभाडे, एम. बी. पावरा, डॉ.डी.डी. कर्दपवार, किशोर खंडाळे, चेतन बाविस्कर, सौ. शुभांगी पाटील, नितेश सोनवणे तसेच जीवन पाटील, अभिजीत बाविस्कर, नरेंद्र सोनवणे, उज्वल मराठे व अनिल पाटील यांनी सहकार्य केले.

या कार्यक्रमाप्रसंगी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षेत्रातील बहुसंख्य प्राध्यापक बंधू- भगिनी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.