प्रजासत्ताक दिनी दहिगाव ग्रामपंचायतीने ध्वजारोहणच केले नाही,तर जळगाव येथील हायस्कूल मधील राष्ट्रध्वज दुपारीच उतरवला, राज्यात दोन ठिकाणी राष्ट्रध्वजाचा अवमान, पोलिसात गुन्हा दाखल
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी आपल्या देहाचे बलिदान दिले. अनेकांनी हाल अपेष्टा सहन केल्या.आणि इंग्रजांच्या ताब्यातून पंधरा ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला.२६ जानेवारी १९५० पासून प्रजासत्ताक दिनाला सुरूवात झाली.प्रजासत्ताकदिन हा राष्ट्रीय सनउत्सव म्हणून साजरा करण्यात यावा म्हणून केंद्रसरकारने घोषित केले.तेव्हापासुन दरवर्षी प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सनउत्सव म्हणून साजरा केला जातो.२६जानेवारी २०२५ रोजी देशभर प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिगाव ग्रामपंचायतीने मात्र ध्वजारोहणच केले नाही.सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात देशद्रोहाची कारवाई करावी म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते शिवा जी म्हस्के यांनी जिल्हाधिकारी,आणि देशाच्या राष्ट्रपती कडे लेखी तक्रार दाखल केली आहे.तर दुसरा प्रकार जळगाव येथील हायस्कूल मध्ये घडला.शाळेच्या शिपायांनी भरदुपारीच तिरंगा खाली उतरून राष्ट्रध्वजाचा अवमान केला म्हणून शिपाया विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या दोन घटना महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्ह्यात घडल्या आहेत.पहिली घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील दहिगाव येथे घडली.प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायतीने कार्यालयांवर तिरंगा ध्वज फडकावलाच नाही.म्हणून सरपंच, ग्रामसेवक, सदस्य यांच्या विरोधात दोन दिवसांत कारवाई करावी अंन्यथा कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शिवा जी म्हस्के यांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात दिला आहे.म्हस्के यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की मी दहिगाव येथील कायम रहिवासी आहे.गावात गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मी माझ्या गावात सामाजिक कार्य करीत आहे.२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी गावातील श्रीराम हायस्कूल येथे तिरंगा ध्वज फडकावन्यात आला.त्यानंतर जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेवर तिरंगा ध्वज फडकावण्यात आला.मी दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयां समोर ध्वजवंदना साठी बसून राहिलो परंतु गावात मनमानी कारभार करणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांना ध्वज वंदना बाबद कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही.दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालय उघडण्यासाठी शिपाई, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, कोणीही आले नाही. कार्यालय बंद होते.सर्वात मोठा पुरावा म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५१६ वर जी.एच.व्ही.कंपनीतर्फे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.यामध्ये संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालया परिसराचे चित्रिकरण होते.हे सर्व चित्रिकरण जी.एच.व्ही.कंपनीच्या कार्यालयातील नियंत्रण कक्षात उपलब्ध आहे.या संबंधातील चौकशी साठी एक उच्चस्तरीय समिती नेमून कसुन चौकशी करून कडक कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.म्हस्के यांनी पंचायत समिती कार्यालय प्रमुख बनकर साहेब,विस्तार अधिकारी माळी साहेब, ग्रामसेवक घोडके, यांच्याशी संपर्क साधला परंतु त्यांनी फोन उचलला नाही.दुसरे विस्तार अधिकारी खाडे साहेब, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मगर साहेब यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिरिक्त ग्रामसेवक म्हणून वाटेफळ साहेब यांची नेमणूक केली असं सांगितलं पण ते दहिगावला आलेच नाहीत.मग दहिगावच्या शिक्षकांना लेखी पत्र दिले की ते शिक्षक दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करतील आणि ग्रामसभेचे कामकाज पाहतील परंतु शिक्षक म्हणाले की आम्ही शाळा सोडून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जाऊ शकत नाही असे त्यांनी तोंडी सांगितले.या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उडवाउडवीच्या उत्तराच्या गलथान कारभारामुळे दहिगाव ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण झालेच नाही.त्यामुळे दहिगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, शिपाई यांच्या विरोधात कडक कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अंन्यथा आत्मदहन करण्यात येईल.असे शिवा म्हस्के यांनी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल, राज्याचे मुख्य सचिव,राष्ट्रपती, यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. दुसरा प्रकार संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील रामदास नाईक हायस्कूल मध्ये घडला. सव्विस जानेवारी रोजी सकाळी या हायस्कूल मध्ये सर्व शिक्षक,पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण झाले.प्रशासनाने सव्विस जानेवारी रोजी ध्वज खाली उतरवण्याची वेळ सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटांची निश्चित केली होती. परंतु औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव येथील रामदास नाईक हायस्कूलचे शिपाई मधुकर दगडू खटाने राहणार (शिवाजी नगर,) छत्रपती संभाजी नगर यांने हायस्कूल मध्ये उभारलेला राष्ट्रध्वज दुपारी एक वाजता खाली उतरवण्याचा प्रकार केला आहे. ही वार्ता हा हा म्हणता सर्व गावभर पसरली.गावातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी,विद्यार्थिनी यांनी शाळेत जाऊन पाहिले असता राष्ट्रध्वज दुपारीच खाली उतरून राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे दिसून आले. या राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक कल्याण त्रिंबक राठोड राहणार खिंवसर नगर,बिडकिन यांनी बिडकिन पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.बिडकिन पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सहायक पोलिस निरीक्षक निलेश शेळके यांनी सदर शिपाया विरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार उबाळे हे करीत आहेत.अशा प्रकारे प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे दिसून आले आहे.