नगरदेवळा उर्दू शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या प्रयत्न करणारी जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळे येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.यावेळी गावातील मान्यवर, पालक व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारीत, नगरदेवळा गावाचे रहिवासी शिक्षक *शेख जावेद रहीम* यांच्या शुभहस्ते झंडा फडकवण्यात आला. झेंडेला सलामी व राष्ट्रगीत नंतर शाळेचे विद्यार्थ्यांनी मनमोहक पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत केला. मान्यवरांचे हस्ते त्यांना बक्षीस हि देण्यात आला. मागच्या सप्ताहात झालेल्या तालुकास्तरीय क्रीडा मध्ये प्रथम क्रमांक पटकावणारे सय्यद बिलाल सय्यद इमरान अली, आयान इरफान अली सय्यद, अदनान बेग,यांना मान्यवरांचे हस्ते ट्रॉफी व सर्टिफिकेट देऊन त्यांचे गुणगौरव करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शेख जावेद रहीम यांनी शाळेत चांगला शैक्षणिक वातावरण निर्माण करणारे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व कार्यरत शिक्षकांचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन सकारात्मक, बळकट व उज्वल समाज घडवण्याच्या एक मात्र उपाय सामाजिकनेताहिन अल्पसंख्यांक समाजा कडे बाकी राहिलेला आहे. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्न दाखवा व गगन भरारी घ्या असे आवाहन त्यांनी ग्रामस्थ व पालकांसमोर मांडले. नगरदेवळा ग्रामस्थ कडून आदर्श शिक्षक शेख जावेद रहीम यांच्या पुष्प व शॉल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेख वसीम गुलाम मोहम्मद, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शेख अफरोज रहीम,वसीम पटवे,उमर बेग, मुशताक खान, मोहसीन शेख, शिक्षक तज्ञ अब्दुल रशीद, हाजी गुलाम मोहम्मद, अन्सार शेख, अभिलाषा रोकडे, नूर चेअरमन व मोठी संख्या मध्ये पालक वर्ग उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला यशस्वी बनवण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, उपशिक्षिका दिलारा सय्यद, इरफाना अन्सारी, रिजवान शेख, खलील शेख, सबा शोएब अन्सारी, अर्शिन शाहरुख शेख यांनी परिश्रम घेतले.