गोकुळ दौंड यांच्या वाळुंज येथील दिपाली पेट्रोल पंपाचा शुभारंभ महंत नामदेव महाराज शास्त्री, आणि प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते संपन्न

गोकुळ दौंड यांच्या वाळुंज येथील दिपाली पेट्रोल पंपाचा शुभारंभ महंत नामदेव महाराज शास्त्री, आणि प्रतापराव ढाकणे यांच्या हस्ते संपन्न

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) ‌ अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे युवा नेते गोकुळभाउ दौंड यांच्या वाळुंज येथील दिपाली पेट्रोल पंपाचा शुभारंभ भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांच्या उपस्थितीत आणि केदारेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन प्रतापराव ढाकणे आणि शेवगाव तालुक्याचे युवा नेते अरुणभाउ मुंडे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पेट्रोल पंपाचा शुभारंभ ढाकणे यांच्या हस्ते तर डिझेल पंपाचा शुभारंभ अरुण मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला.युवा नेते गोकुळ दौंड यांनी अशी खंत व्यक्त केली की रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी अतिशय घाईघाईने आदेश दिले की सव्विस जानेवारी रोजी “जीवो ” पेट्रोलपंपाचा शुभारंभ करून पेट्रोल विक्रीस प्रारंभ करावा म्हणून अनेक जवळच्या कार्यकर्त्यांना आमंत्रित करता आले नाही.नुसते हाॅटसाप वर मेसेज पाठवून ईतके पाहुणे जमा झाले आहेत. अनेक मान्यवरांनी व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. आलेल्या सर्व पाहुण्यांनी युवा नेते गोकुळ दौंड आणि पाथर्डी पंचायत समितीच्या माजी सभापती सौभाग्यवती सुनिता गोकुळ दौंड यांचा सपत्नीक सत्कार केला.आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छाही दिल्या. यावेळी व्यासपीठावरून बोलताना प्रतापराव ढाकणे म्हणाले की ज्याला सार्वजनिक जीवनात स्वाभिमानी राजकारण करायचे असेल तर त्यांनी प्रथम त्यांची उत्पन्नाची साधने भक्कमपणे निर्माण केली पाहिजे.स्वर्गिय बबनराव ढाकणे यांनी तेरा व्यवसाय सुरू केले होते.एका बाजुला राजकारण करीत असताना दुसऱ्या बाजूला प्रपंचाची धडाडीचे उभारणी केली होती. आज माझे सहा व्यवसाय आहेत.उत्पनाची साधनं निर्माण केल्याशिवाय व प्रपंच स्ट्रांग केल्याशिवाय सार्वजनिक जीवनात छातीठोकपणे राजकारण करता येतं नाही.लोकांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर तो माणूस मोठ्या उत्पन्नाने सधन असला पाहिजे हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.असे प्रतापराव ढाकणे यांनी यावेळी स्पष्ट शब्दात सांगितले. अरुणभाउ मुंडे यांनी सांगितले की गोकुळभाउ दौंड आणि माझे राजकारणा पलिकडचे संबंध आहेत.पणआमच्या पक्षात काही भामटे लोक नुसत्या उखाळ्या पाखाळ्या उकरून काढण्यात आणि बदनामी करण्यात पटाईत आहेत.त्यांना नुसता तेवढाच धंदा आहे असे कोणाचेही नाव न घेता भाजपच्या मुंडे यांच्या वर टीका करणाऱ्या लबाड कार्यकर्त्यांना त्यांनी चपराक देत चांगलेच खडसावले.या पेट्रोल पंपाच्या शुभारंभा साठी गहिनीनाथ शिरसाट,ह.भ.प.गीरी महाराज,अजय बारस्कर, सुभाष दौंड, अंकुश कुसळकर,अजय केदार, संदिप बेळगे, संदिप फुंदे, विलास घाटुळ, भास्कर कराड,संपत गर्जे, पोपट बडे, महादेव दहिफळे, बाळासाहेब मुरदारे, बाळासाहेब दराडे, संदिप राजळे,पप्पू केदार,अर्जुन धायतड, फुलचंद रोकडे,मॅनेजर अमिन लुनिया ,महेश बोरुडे,कलिम पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या “जीओ”पेट्रोल पंपावर एक रुपया स्वस्त दरात पेट्रोल देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे परीसरातील ग्राहकांनी याचा अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन गोकुळभाउ दौंड यांनी केले आहे.हा पेट्रोल पंप पाथर्डी शहरापासुन पुर्वेला तिनं किलो मीटर अंतरावर कोरडगाव रोडवर वाळुंज शिवारात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर उभारण्यात आला आहे.